VIDEO : डॉक्टर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करत होते, महिला वॉयलिन वाजवत होती!

ब्रिटनच्या एका रुग्णालयात अनोख्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात (girl play Violin during operation) आली आहे.

girl play Violin during operation, VIDEO : डॉक्टर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करत होते, महिला वॉयलिन वाजवत होती!

लंडन : ब्रिटनच्या एका रुग्णालयात अनोख्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात (girl play Violin during operation) आली आहे. ब्रेन सर्जरी दरम्यान एक महिला आपले वॉयलिन वाजवत होती. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डॅगमर टर्नर असं याा महिलेचे (girl play Violin during operation) नाव आहे.

ब्रिटनमध्ये एका महिलेच्या डोक्याची शस्त्रक्रिया सुरु आहे. ब्रेन सर्जरीची शस्त्रक्रिया सुरु असताना ती वॉयलिन वाजवत आहे. कारण शस्त्रक्रियेनंतर ती वॉयलिन वाजवणे विसरु नये म्हणून ती वॉयलिन वाजवत होती. गेल्या 40 वर्षांपासून ती वॉयलिन वाजवत आहे. तिला वॉयलिन वाजवणे खूप आवडते.

“वॉयलिन वाजवणे माझे पॅशन आहे. मी 10 वर्षाची असल्यापासून वॉयलिन वाजवत आहे”, असं टर्नरने सांगितले.

वॉयलिन वाजवल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान डोक्यातील संवेदनशील भाग व्यवस्थित काम करत असल्याचे माहित पडते. या शस्त्रक्रियेचा व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान टर्नल आपल्या आवडीची मेहलर आणि जेरश्विर म्युझिक वाजवत आहे. यावेळी तिच्या डोक्यातून ट्युमरही यशस्वीपणे काढण्यात आला.

“आम्ही महिलेच्या डोक्यातून 90 टक्के ट्युमर काढले आहेत. आमच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर टर्नरने आम्हाला धन्यवादही दिले”, असं प्रोफेसर आश्कन यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *