मोदी सरकारला जाहिरातीची भारीच हौस, एका वर्षात तब्बल 713 कोटींचा खर्च

| Updated on: Oct 31, 2020 | 11:17 PM

मोदी सरकारकडून जाहिरातीवर होणाऱ्या खर्चावर विरोधकांनी वेळोवेळी बोट ठेवलेलं आहे. त्यातच मोदी सरकारने 2019-2020 या आर्थिक वर्षात जाहिरातींवर तब्बल 713 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे

मोदी सरकारला जाहिरातीची भारीच हौस, एका वर्षात तब्बल 713 कोटींचा खर्च
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून जाहिरातीवर होणाऱ्या खर्चावर विरोधकांनी वेळोवेळी बोट ठेवलेलं आहे. त्यातच मोदी सरकारने 2019-2020 या आर्थिक वर्षात जाहिरातींवर तब्बल 713 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते जतीन देसाई यांना माहिती आधिकार कायद्याखाली ही माहिती देण्यात आली आहे. (Modi government spends 713 crores on advertisements 317 crores for electronic media)

मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2019-2020 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने शासकीय योजनांच्या जाहिरातींसाठी तब्बल 713 कोटींचा खर्च केला आहे. म्हणजेच एका दिवसाला केंद्र सरकारने जवळपास 1.95 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खर्च मागील आर्थिक वर्षाचा असून यामध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचाही हिशोब आहे. ही सर्व माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्यूरो ऑफ आउटरीच अ‌ॅण्ड कम्युनिकेशन विभागाने दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियावर सर्वात जास्त खर्च

जतीन देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने वर्षभरात एकूण 713 कोटींचा खर्च केला. त्यापैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरातीसाठी केंद्राकडून 317 कोटींचा खर्च करण्या आला. हा खर्च इतर माध्यमांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. तर प्रिंट मीडियासाठी मोदी सरकारने 295.05 कोटी रुपये मोजले आहेत. आउटडोअर मीडियावर जाहिरात करण्यासाठी केंद्राने 101.10 कोटी रुपये दिले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारकडून जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केलेला आहे. अशातच ही माहिती समोर आली आहे. हा खर्च शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी झाला असला तरी; मोदी सरकारला जाहिरातीची भारीच हौस असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.

सबंधित बातम्या :

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये ‘एवढे’ दिवस बँका बंद; जाणून घ्या…

काश्मीर, अयोध्या, कट्टरतावाद आणि पुलवामा… पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे

भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा

(Modi government spends 713 crores on advertisements 317 crores for electronic media)