नाव बदलून टाक, दुर्गा पुजेवरुन खासदार नुसरत जहां पुन्हा मौलवींच्या निशाण्यावर

| Updated on: Oct 08, 2019 | 8:31 AM

तृणमूल काँग्रेस (TMC)पक्षाची तरुण खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांनी दुर्गा पुजा केल्याने देवबंदी उलेमा त्यांच्यावर नाराज आहेत (Nusrat Jahan Durga Puja). नवरात्री दरम्यान नुसरत यांनी त्यांचे पती निखिल जैन यांच्यासोबत कोलकाता येथे दुर्गा पुजा केली होती.

नाव बदलून टाक, दुर्गा पुजेवरुन खासदार नुसरत जहां पुन्हा मौलवींच्या निशाण्यावर
Follow us on

मुंबई : तृणमूल काँग्रेस (TMC)पक्षाची तरुण खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां यांनी दुर्गा पुजा केल्याने देवबंदी उलेमा त्यांच्यावर नाराज आहेत (Nusrat Jahan Durga Puja). नवरात्री दरम्यान नुसरत यांनी त्यांचे पती निखिल जैन यांच्यासोबत कोलकाता येथे दुर्गा पुजा केली होती. याबाबतचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, त्यांनी दुर्गा पुजा केल्याने देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी त्यांनी नाव बदलून घ्यावं, असा सल्ला दिला (Nusrat Jahan Change her Name).

‘जर नुसरत जहांला गैर-धार्मिक कामं करायची असतील तर ती तिचं नाव बदली शकते’, असं देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी सांगितलं. यावर नुसरत जहां यांनीही देवबंदी उलेमा यांना उत्तर दिलं आहे.

‘ज्यांनी मला नाव दिलं नाही त्यांना माझं नाव बदलण्याचा काहीही हक्क नाही. हे हिंदू-मुस्लीमांबाबत नाही आहे. देवबंदी यांनी आराम करावा, ही वेळ आनंद साजरा करण्याची आहे राजकारण करण्याची नाही’, असं प्रत्युत्तर नुसरत जहां यांनी देवबंदी यांना दिलं.

यापूर्वीही नुसरत जहां देवबंदी उलेमाच्या निशाण्यावर

कपाळावर कुंकू लावल्यामुळे आणि मंगळसूत्र घातल्याने देवबंदी उलेमा यांनी यापूर्वीही नुसरत जहां यांच्यावर निशाणा साधलाहेता. काही दिवसापूर्वी नुसरत जहां या भगवान जगन्नाथच्या रथयात्रेत सहभागी झाल्या होत्या. इस्कॉनच्या कोलकातामध्ये जगन्नाथ रथयात्रेत विशेष आमंत्रणावर नुसरत यांनी त्यांच्या पतीसोबत रथयात्रेत भाग घेतला होता. यावर फतवा ऑनलाईनचे प्रभारी मुफ्ती अरशद फारुकी यांनी यावर आक्षेप घेतला होता. मुसलमान कुठल्याही दुसऱ्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

तसेच, खासदार नुसरत जहां यांनी साडी, कुंकू आणि मंगळसूत्र गालून संसदेत शपथ घेतली होती, यामुळे त्यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला होता. देवबंदच्या धर्मगुरुंच्या मते, मुस्लीम मुलींना फक्त मुस्लीम मुलांशीचं लग्न करायला हवं.