शाहू महाराजांनी 200 वर्षांनंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही? : संभाजीराजे

| Updated on: May 30, 2021 | 8:08 PM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला आहे.

शाहू महाराजांनी 200 वर्षांनंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं, आज मराठा समाजाला का नाही? : संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती
Follow us on

नांदेड : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला आहे. “शाहू महाराजांनी 200 वर्षांनंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं. केवळ मराठ्यांना दिलं नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही?” असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे. ते नांदेडमध्ये एका सभेत बोलत होते (MP Sambhajiraje Chhatrapati comment on Maratha Reservation in Nanded Public Meeting).

खासदार संभाजीराजे म्हणाले, “शाहू महाराजांनी 200 वर्षांनंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्यांनी केवळ मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. त्यावेळच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग आज मराठा समाज मुख्यप्रवाहात का नाही? का मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे.”

न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे मी या मताचा आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

“अनेक नव्या कार्यकर्त्यांना शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचं काम माहिती नाही”

“अनेक नवे कार्यकर्ते तयार होतात मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी कसं काम केलं हे माहिती नसतं. शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं नाही, तर अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज देखील माझं स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं सांगतात,” असंही मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.

“खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्यांचं नातंच होऊ शकत नाही”

संभाजीराजे म्हणाले, “मराठवाड्याच्या दौऱ्यात लोक मास्कच घालत नाही. इतके बिनधास्तपणे नांदेडचे लोक राहतात. आता ज्यांनी घातलेत त्यांनी मी आलोय म्हणून घातलेत. मी त्यांना सांगितलं की मास्क घाला त्याशिवाय जवळ यायचं नाही. पण माझा मनापासून इच्छा आहे की लवकरात लवकर सर्वांनी जवळ यावं. लोकंच जवळ आली नाही तर येऊन उपयोग नाही. खांद्याला धक्काबुक्की झाल्याशिवाय छत्रपती घराण्याचं आणि मावळ्यांचं नातंच होऊ शकत नाही. समाज अडचणीत असताना त्याचे धक्केबुक्के खाल्ले पाहिजे. यातूनच प्रेम निर्माण होतं. यातूनच जीवाचे संबंध तयार होतात. हेच संस्कार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी दिलेत.”

“परवानगी आहे तितक्याच लोकांना घेऊन आम्ही कार्यक्रम करतोय, पण काही जागी हजारो लोक जमतयात. तिथे मात्र काही कारवाई होत नाहीये,” असंही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

एक राजा बिनडोक, तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर, प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात

संबंधित व्हिडीओ :

MP Sambhajiraje Chhatrapati comment on Maratha Reservation in Nanded Public Meeting