माझं ते भाकीत खरं ठरलं, आताही सांगतो, संजय राऊतही ठाकरेंची साथ सोडणार, कुणी वर्तवलं भाकीत?
आमच्याही पक्षात इनकमिंग जोरात आहे. दोन दिवसांत आमच्या शिवसेना पक्षात ठाकरे गटाचे किती नेते येणार आहेत ते पाहा. संजय राऊत हाच किती दिवस ऊबाठात राहिल हे सांगता येत नाही. ते ही ठाकरे यांची साथ सोडतील
मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेस नेते लवकरच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेली काही महिने सुरु होती. अशोक चव्हाण यांनी सोमवारी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश केला. यावरून अशोक चव्हाण यांच्यावर आता काही जन टीका करत आहेत. तर काही त्यांचे समर्थन करत आहेत. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये इन कमिंग सुरु झाले आहे. अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटातील काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केलंय.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार हे मी १३ एप्रिलला सांगितले होते. तेव्हा त्यांनी माझ्यावर टिका केली होती की संजय शिरसाट हे ज्योतिष झालेत का? पण आज हे भाकित खरं ठरलं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
फेब्रूवारी महिन्यातील हा पंधरवाडा ब्रेकिंग न्युजचा असेल असा दावा संजय शिरसाट यांनी केला. ते पुढे म्हणाले, आमच्याही पक्षात इनकमिंग जोरात आहे. दोन दिवसांत आमच्या शिवसेना पक्षात ठाकरे गटाचे किती नेते येणार आहेत ते पाहा. संजय राऊत हाच किती दिवस ऊबाठात राहिल हे सांगता येत नाही. ते ही ठाकरे यांची साथ सोडतील आणि लवकरच इतर पक्षात जातील, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
राज्यसभेचे पत्ते आम्ही एवढ्यात उघडणार नाही. पण, राज्यसभेच्या जागा आमच्याच असतील हे निश्चित आहे. अशोक चव्हाण यांच्यावर जे आरोप करत आहेत ते ही आधी मोंदी यांचे गुणगाण गातच होते ना? असा तोल त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला. आता जुन्या टिकाटिप्पणींना काय अर्थ? असेही ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्या वडिलांमुळे जायकवाडी धरण बनलं. त्या धरणाचे पाणी आज आम्ही पाणी पितोय. मराठवाड्यासाठी त्याचे योगदान मोठ्ठं आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीतही महायूतीचा विजय होईल असेही ते म्हणाले.