नागपूर महापालिकेचे 12 कर्मचारी बडतर्फ, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

| Updated on: Jun 06, 2020 | 8:57 AM

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आठ दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या 60 कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सेवामुक्त (Tukaram Mundhe dismiss 12 Workers) केलं होतं.

नागपूर महापालिकेचे 12 कर्मचारी बडतर्फ, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश
Follow us on

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं (Tukaram Mundhe dismiss 12 Workers) आहे. तब्बल 18 वर्षांच्या संघर्षानंतर 10 महिन्यापूर्वी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र या नियुक्ती अवैध ठरवत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळात या 12 कर्मचाऱ्यांचे परिवार रस्त्यावर आले आहेत.

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आठ दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या 60 कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सेवामुक्त केलं होतं. त्यानंतर आता या 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटकाळात तब्बल 72 परिवारावर संकट ओढावलं आहे.

नागपूर महानगरपालिकेनं बडतर्फ केलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये ग्रंथालय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. न्यायालय आणि राज्य सरकारसोबतच्या दीर्घ लढ्यानंतर 10 महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या नियुक्तीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शिफारस केली होती. पण आता या 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात या कर्मचाऱ्यांचे परिवार रस्त्यावर आले (Tukaram Mundhe dismiss 12 Workers) आहेत.

संबंधित बातम्या :

नागपुरात तुकाराम मुंढेंना शिवसेनेची खंबीर साथ, भाजप-काँग्रेसचा मात्र कडाडून विरोध

Nagpur Corona | नागपुरात ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात