खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा, रॅकेटचा पर्दाफाश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नागपूर : खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा देणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नकली नोटांचे आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात फसवणाऱ्या या टोळीवर धाड टाकून नागपूर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नागपूर पोलिस अधिक तपास करत आहेत. असे फसवायचे! खऱ्या नोटांच्या बदल्यात नकली नोटा देणारी ही टोळी आधी सावज हेरायची. यासाठी […]

खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा, रॅकेटचा पर्दाफाश
Follow us on

नागपूर : खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा देणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नकली नोटांचे आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात फसवणाऱ्या या टोळीवर धाड टाकून नागपूर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात नागपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

असे फसवायचे!

खऱ्या नोटांच्या बदल्यात नकली नोटा देणारी ही टोळी आधी सावज हेरायची. यासाठी ते नकली नोटा चालवणाऱ्याचा शोध घ्यायचे आणि त्याला गाठून खऱ्या नोटांच्या बदल्यात तिप्पट नकली नोटा देण्याचं आमिष देत असत. त्यानंतर तारीख आणि जागा ठरली की, नकली नोटा घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचे. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी धाड पडायची. धाड टाकणारे सुद्धा आरोपी टोळीचेच नकली पोलिस असायचे. खऱ्या आणि नकली अशा दोन्ही नोटा घेऊन ही टोळी पळ काढायची.

पोलिसांनी या टोळीतील तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख 20 हजार रुपये सुद्धा जप्त केले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र ही मोठी टोळी असून ते देशभरात अशी कामे करत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.