चंद्राबाबूंनी बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेला नांदेडमधील बाभळी बंधारा भरला

| Updated on: Oct 30, 2019 | 12:32 PM

गोदावरी नदीवर बांधलेला बाभळी बंधारा यंदा प्रथमच पूर्णपणे भरला (Nanded babhali bandhara full) आहे. विशेष म्हणजे हा बंधारा सात वर्षापूर्वी बांधण्यात आला होता.

चंद्राबाबूंनी बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेला नांदेडमधील बाभळी बंधारा भरला
Follow us on

नांदेड : गोदावरी नदीवर बांधलेला बाभळी बंधारा यंदा प्रथमच पूर्णपणे भरला (Nanded babhali bandhara full) आहे. विशेष म्हणजे हा बंधारा सात वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. पण या बंधाऱ्यात आजपर्यंत कधीच पाणीसाठी करण्यात आला नव्हता. मात्र यंदा परतीच्या पावसाने बाभळी बंधारा पूर्ण भरलेला (Nanded babhali bandhara full) आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर हा बंधारा बांधण्यात आला आहे. या बाभळी बंधाऱ्यामुळे तेलंगणातील निजामसागर हे धरण कोरडे पडेल, असा कांगावा तेलंगणातील तत्कालीन नेत्यांनी केला होता आणि त्यांनी बाभळी बंधाऱ्यांच्या निर्मितीला विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही बाभळी बंधारा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी त्यांनी दिली होती.

बाभळी बंधाऱ्याचा वाद इतका विकोपाला गेला होता की अखेर सर्वोच्च न्यायालयाने यावर तोडगा काढला होता. सर्वोच्च न्यायालयात हा वाद गेल्यानंतर न्यायालयाने बाभळी बंधाऱ्याला परवानगी दिली. मात्र बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे हे ऑक्टोबर अखेरीस बंद करावे लागतील, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नसे.

बाभळी बंधारा पावणेतील टीएमसी क्षमतेचा आहे. हा बंधारा आता पूर्ण भरल्यामुळे तब्बल चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. तसेच बाभळी प्रकरणावर नकुत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

2013 रोजी तयार झालेल्या या बंधाऱ्यात आजपर्यंत कधीच पाणी साचले नव्हते. यंदा मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऑक्टोबर अखेरीसही गोदावरी नदी पात्र दुथडी भरुन वाहतेय. त्यातच बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे नियमाप्रमाणे 29 ऑक्टोबरप्रमाणे संध्याकाळी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे बाभळी यंदा पूर्ण भरला आहे. याचा फायदा नायगाव, उमरी, धर्माबाद आणि बिलोली या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे.