AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान भावाच्या बायकोवर डोळा, मोठ्या भावाची हत्या करुन पोत्यात भरलं!

सततचा कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधाच्या वादातून लहान भावाने चुलत भावाच्या मदतीने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला.

लहान भावाच्या बायकोवर डोळा, मोठ्या भावाची हत्या करुन पोत्यात भरलं!
| Updated on: Jul 26, 2019 | 8:49 AM
Share

मृत रफिक शेख

नाशिक : सततचा कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधाच्या वादातून लहान भावाने चुलत भावाच्या मदतीने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला. इतकंच नाही तर मृतदेह शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावात  घडली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी लहान भाऊ आणि त्याला मदत करणाऱ्या चुलत भावाला अटक केली आहे.

रफिक शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, आरोपी लहान भाऊ तौफिक शेख आणि आरोपी चुलत भाऊ सलमान शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत.

माणिकपुंज गावाजवळ रस्त्यालगत  मंगळवारी 27 वर्षीय रफिक शेख या तरुणाचा मृतदेह आढळला होता. याबाबत रफिकच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. रफिक हा मका पिकाला पाणी देण्यासाठी सोमवारी संध्याकाळी गेला होता, तो सकाळपर्यंत घरीच परतला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतर गावातील रस्त्यालगत मृतदेह आढळला.

याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता रफिकचा लहान भाऊ तौफिक आणि चुलत भाऊ सलमानच्या हालचाली संशायास्पद वाटू लागल्या. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तौफिकने गुन्ह्याची कबुली दिली.

मोठा भाऊ रफिक हा दादागिरी करत लहान भाऊ तौफिकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाची मागणी करत असल्याची माहिती तौफिकने दिली. त्या रागातूनच ही हत्या केल्याचं तौफिकने सांगितलं.

भावाचा काटा काढण्याचा कट 8 दिवसापूर्वी रचला. 23 जुलै रोजी तौफिक आणि सलमानने वीज पंप चालू होत नसल्याचे सांगून, रफिकला शेतात बोलावून घेतले. तू माझ्या बायकोला का त्रास देतो, अशी विचारणा तौफिकने रफिकला केली. दोघांमध्ये वादावादी होऊन झटापट झाली.

या वादात तौफिक आणि सलमानने रफिकच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केले आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून शेतातच लपवून ठेवला. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास मृतदेह गावाच्या रस्त्यालगत फेकून दिला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.