मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार

| Updated on: May 04, 2020 | 2:09 PM

"मी आज कमीत कमी 7 ते 8 क्वार्टर पिणार, गेल्या दोन महिन्यातील उरलेली कसर भरुन काढणार आहे," असा निर्धार नाशिकच्या एका पठ्ठ्याने केला (Nashik People reaction after liquor shop open) आहे.

मी आज 7 ते 8 क्वार्टर पिणार, कसर भरुन काढणार, नाशिकच्या पठ्ठ्याचा निर्धार
Follow us on

नाशिक : कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला (Nashik People reaction after liquor shop open) सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर वाईन शॉप्सवर तळीरामांनी गर्दी केली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अनेक ठिकाणी मद्य प्रेमींना लांबच लाबं रांगा लावल्या. नाशिकमध्ये एका वाईन शॉपच्या दुकानसमोरील रांगेत उभा असलेल्या एका पठ्ठ्या अनोखा निर्धार करुन आला होता.

नाशिक शहरातही अशाचप्रकारे ठिकठिकाणच्या वाईन शॉपसमोर गर्दी केली (Nashik People reaction after liquor shop open) होती. यामुळे मद्यप्रेमींचे चेहरेही आता खुलले आहेत. “मी आज कमीत कमी 7 ते 8 क्वार्टर पिणार, गेल्या दोन महिन्यातील उरलेली कसर भरुन काढणार आहे,” असा निर्धार नाशिकच्या एका पठ्ठ्याने केला आहे.

“दादा किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला. दारुची दुकान उघडणार हे ऐकल्यानंतर मला इतका आनंद वाटतोय. मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. याआधी मला इतका आनंद कधीही झालेला नाही,” असे ‘टीव्ही  9 मराठी’शी बोलताना या व्यक्तीने सांगितले.

“दारुची दुकान आजपासून सुरु होणार आहे. मी आज कमीत कमी १२ ते १३ क्वार्टर विकत घेणार आहे. यातील ७ ते ८ आज पिणार आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून मी आज थांबलो होतो. ती सर्व कसरत मी आज भरुन काढणार आहे.

एवढंच नव्हे तर कमीत कमी तीन ते चार किलो बकऱ्याचं मटण घेणार आहे. त्यातील दोन किलो मटणाची भाजी करणार आणि दोन किलो सुक मटण खाणार आहे.

यानंतर मी छान आरामात झोपणार आहे आणि त्यानतंर तीन दिवसांनी मी उठणार आहे,” असे या व्यक्तीने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हटलं.

तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून वाईन शॉप सुरु होणार आहेत. वाईन शॉप बंद असतानाच दुकानाबाहेर काही मद्यपी घुटमळत होते. तर वसई, विरार आणि नालासोपारामध्येही वाईन शॉपबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत तर काही ठिकाणी उल्लंघन करत अनेक जण वाईन शॉपसमोर उभे होते.

हेही वाचा – हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले

पुण्यात मोठ्या प्रतीक्षेनंतरही मद्य विक्री सुरु न झाल्यामुळे मद्यप्रेमी निराश झाले. वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस दुकानासमोर दाखल झाले.

ठाण्यात वाईन शॉप सुरु होणार नसल्याचे सांगत पोलीस रांग लावल्यास कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. तर नवी मुंबईतही वाईन शॉप सुरु होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. सोलापूर शहरातही स्थानिक प्रशासनाने दारु विक्रीस परवानगी दिलेली (Nashik People reaction after liquor shop open) नाही.