बेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला

नवी मुंबईत बेपत्ता असल्याचा बनाव करत एक व्यक्ती बायोकाला सोडून प्रेयसीसोबत पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेपत्ता झाल्याचा बनाव, नवी मुंबईचा विवाहित तरुण गर्लफ्रेंडसोबत इंदूरला सापडला
| Updated on: Sep 17, 2020 | 7:57 AM

नवी मुंबई : नवी मुंबईत बेपत्ता असल्याचा बनाव करत एक व्यक्ती बायोकाला (Vashi Missing Man) सोडून प्रेयसीसोबत पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनीष मिश्रा (वय 28) असं या पतीचं नाव असून तो आपल्या बायकोला सोडून प्रेयसीसोबत इंदूरला पळून गेला होता. वाशी पोलिसांनी तपास करत या व्यक्तीला शोधून काढलं तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला (Vashi Missing Man).

तळोजा येथे राहणाऱ्या मनीष मिश्रा वय हे 24 जुलै रोजी सकाळी जेएनपीटी येथे कामासाठी जात आहे, असे पत्नीला सांगून घरातून निघाले. मोटारसायकल घेऊन ते घरातून निघून गेले. त्यानंतर रात्री त्यांच्या पत्नीला फोन करुन तो आता वाशी येथील लॅब जवळ असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्यांना कोरोनाची लागण झाली असून ते आता जगणार नाही, असे रडून त्यांच्या पत्नीला सांगितलं. पत्नी समजावून सांगत असतानाच त्यांनी कॉल कट केला. त्यानंतर त्यांचा फोन सतत बंद येत होता.

नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता. रस्त्याच्या कडेला मनीष मिश्रा यांची मोटारसायकल रस्त्याच्या चवीसह आढळली. त्याशिवाय, त्यांची ऑफिस बॅग, हेल्मेट या वस्तू वाशी सेक्टर 17 येथे आढळून आल्या. मनीष मिश्रा यांचा मेव्हणा सौरभ तिवारी याने वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

या प्रकरणाचा वाशी पोलिसांनी बारकाईने तपास चालू केला. मनीष मिश्रा यांचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मनीष मिश्रा एका महिलेसोबत कायमस्वरुपी इंदूर येथे वास्तव्यास गेले असल्याचं निष्पन्न झाले.

Vashi Missing Man

संबंधित बातम्या :

शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष, शेतकऱ्याला 19 लाखांचा गंडा, भामट्याला बेड्या

उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी बेपत्ता, तब्बल नऊ महिन्यानंतर खुनाचा उलगडा, नातेवाईकांना अटक