मोदी इव्हेंट करण्यात पटाईत, आव्हाड कडाडले, चूल पेटवण्याऐवजी दिवे पेटवण्याचा उपदेश, मलिक यांची खोचक टीका

| Updated on: Apr 03, 2020 | 12:00 PM

लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले. (NCP on Narendra Modi appeal to Light candles)

मोदी इव्हेंट करण्यात पटाईत, आव्हाड कडाडले, चूल पेटवण्याऐवजी दिवे पेटवण्याचा उपदेश, मलिक यांची खोचक टीका
Follow us on

मुंबई : लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (NCP on Narendra Modi appeal to Light candles)

वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील, परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले. सकाळी नऊ वाजता पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून देशवासियांच्या पदरात घोर निराशा पडल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.

आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील, किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत. मोदी यांचा हा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा आहे. लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले.

टाळी-थाळीनंतर पंतप्रधान आता दिवे लावण्याचा इव्हेंट करत आहेत. देशाला इव्हेंटची आवश्यकता नाही. कोव्हीड 19 शी लढण्यासाठी हॉस्पिटल, व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग लॅबची गरज आहे. रोजंदार आणि स्थलांतरित कामगारांच्या जगण्यासाठी पॅकेज. हे पब्लिसिटी स्टंट थांबवा आणि काही ठोस पावले उचला, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.