
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री अचानक गर्दी उसळली. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. काही जणांना एलएनजेपी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या चेंगराचेंगरीत बिहारमधील सोनपूर येथे राहणारे पप्पू कुमार यांच्या सासूचा मृत्यू झाला. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या चेंगराचेंगरीचा संपूर्ण घटनाक्रम पप्पू कुमार यांनी सांगीतला. त्यातून या घटनेत हकनाक कसे बळी गेले हे समोर आले आहे.
सासू घरी पोहचलीच नाही
या घटनाक्रमाची माहिती पप्पू कुमार यांनी दिली. त्यानुसार ते सासूला तिच्या गावी सोडवायला जात होते. ती जवळपास 50 वर्षांची होती. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता ते रेल्वेने गावी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आले होते. त्यांना बिहारमधील दानापूर येथे जायचे होते. दानापूर येथून सोनपूर येथे जायचे होते. सोनपूर हे पप्पू कुमार यांचे गाव आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर ते रेल्वेची वाट पाहत होते. जवळपास 9 वाजता चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक लोक दबले. त्यात त्यांची सासू पण होती.
वेळीच उपचार नाही मिळाले
पप्पू कुमार यांनी या घटनेत लोकांचा जीव का गेला, याविषयी एक दावा केला आहे. त्यांच्या मते, अचानक रेल्वे स्टेशनवर गर्दी उसळली. त्यापूर्वी या रेल्वे स्टेशन काहीच गर्दी नव्हती. अचानक गर्दी आली. ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी पोलीस आणि प्रशासनमधील कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर वेळेवर ॲम्बुलन्स न मिळाल्याने वृद्ध लोकांना रुग्णालयात उपचारासाठी नेता आले नाही. त्यामुळे अनेकांचा जीव गेला. त्यांच्या सासूला सुद्धा वेळेत रुग्णालयात उपचारासाठी नेता आले नाही. त्यामुळे तिचा जीव गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. ज्यांनी या घटनेत जवळील नातेवाईकांना गमावले. त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे ते म्हणाले. तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. या चेंगराचेंगरीचा ज्यांना फटका बसला आहे, त्यांना