AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC ची आनंदवार्ता ‘ऐकली’ का? Champions Trophy च्या कॉमेंट्रीबाबत मोठा ट्विस्ट

ICC Champions Trophy 2025 : शिवजयंतीपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा हंगाम सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी रोजी खेळण्यात येईल. त्यापूर्वी एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. कॉमेंट्रीबाबत मोठा ट्विस्ट समोर आले आहे.

ICC ची आनंदवार्ता 'ऐकली' का? Champions Trophy च्या कॉमेंट्रीबाबत मोठा ट्विस्ट
| Updated on: Feb 15, 2025 | 10:07 PM
Share

क्रिकेटचा महाकुंभ 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जगातील दिग्गज क्रिकेट आखाडे म्हणजे संघ यामध्ये सहभागी होतील. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. पण सध्या या पारंपारिक हाडवैऱ्याशी संबंध पाहता भारतीय संघाच सर्व सामने दुबईत होत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारतीय सामने होतील. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानवर आयसीसीने विश्वास दाखवला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी रोजी खेळण्यात येईल. त्यापूर्वी एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. कॉमेंट्रीबाबत मोठा ट्विस्ट समोर आले आहे.

8 संघाचा महाकुंभ

चॅम्पियन ट्रॉफीचा कुंभ मेळा 19 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. तर अखेरचा विजेता पदासाठीचा सामना 9 मार्च रोजी होईल. 8 संघांचा दोन गटात समावेश करण्यात आला आहे. एका गटात चार संघ असतील. आयसीसीने विजेता, उपविजेता, तसेच खेळाडूंसाठीचे बक्षीस जाहीर केले आहेत. यावेळी विजेत्याला घसघशीत बक्षीस मिळणार आहे. विजेता संघाला 20 कोटी तर उपविजेत्याला 10 कोटींची लॉटरी लागणार आहे. तर सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 1 कोटी रुपये देण्यात येतील. गेल्यावेळीच्या तुलनेत ही रक्कम 53 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी समालोचनाविषयी एक मोठी घोषणा केली आहे.

आता मराठीत ऐका कॉमेंट्री

आयसीसीने देशी क्रिकेट चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. आता आयसीसी सामन्यांचे थेट प्रेक्षपण पाहताना, त्याचे समालोचन स्थानिक भाषेत ऐकता येईल. आतापर्यंत हिंदी अथवा इंग्रजीत सामन्यांची कॉमेंट्री होत होती. तर आता पहिल्यांदाच 9 भारतीय भाषांमध्ये (ICC Champions Trophy Streamed in 9 Languages) सामान्यांचे धावते समालोचन ऐकता येईल. तसे क्रिकेट लाईव्ह प्रक्षेपणात स्थानिक भाषेत कॉमेंट्री होईल.

जिओ हॉटस्टार ॲपवर लाईव्ही स्ट्रीमिंग होईल. तर स्पोर्टस 19 आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल. त्यावेली इंग्रजी, हिंदी भाषेसोबत मराठी, बंगाली, भोजपूरी, हरियाणवी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या 9 भाषांमध्ये समालोचनाचा आनंद घेता येईल. अस्सल मराठीत, रांगड्या भाषेत या सामन्यांच्या समालोचनाची मज्जा अनुभवता येईल.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.