एक, दोन, नव्हे तर तब्बल 23 वेळा माऊंट एव्हरेस्ट पार

एक, दोन, नव्हे तर तब्बल 23 वेळा माऊंट एव्हरेस्ट पार

काठमांडू नेपाळ : माऊंट ऐव्हरेस्ट सर करणं हे प्रत्येकाचं गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. जगातील सर्वच गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर एका गिर्यारोहकाने तब्बल 23 वेळा पार केला आहे. कामी रिता शेरपा असे या व्यक्तीचे नाव आहे. कामी यांनी याआधी 22 वेळा माऊंट एव्हरेस्ट पार करत विश्वविक्रम केला होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा यशस्वीरित्या एव्हरेस्ट शिखर सर करत स्वत:चा विक्रम मोडला आहे.

कामी रिता हे नेपाळमधील गिर्यारोहक आहे. त्यांचे वय 48 वर्ष आहे. कामी या गिर्यारोहकाने नेपाळकडून एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली. आज (15 मे) सकाळी 7.50 मिनीटांनी त्यांनी माऊंट ऐव्हरसेट सर केला.

याआधी 16 मे 2018 ला त्यांनी माऊंट ऐव्हरेस्ट सर केला होता. त्यावेळी कामी यांनी सकाळी 8 हजार 848 मीटर चढाई केली होती. कामी यांना गिर्यारोहणाचा चांगला अभ्यास आहे. त्यांना कित्येक गिर्यारोहक आपले गुरूही मानतात.

याआधी सर्वाधिक 21 वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा रेकॉर्ड अप्पा आणि फुर्बा ताशी या दोन गिर्यारोहकांच्या नावे आहे. मात्र गेल्यावर्षी 22 वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करत कामी यांनी हा रेकॉर्ड ब्रेक केला. त्यानंतर पुन्हा एकदा कामी यांनी स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक करत माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई केली आहे.

कामी रीता कोण आहेत ?

कामी रीता यांचा जन्म नेपाळच्या थामे या ठिकाणी 1970 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ट्रेनिंग घेत कंचनजंगा-2, चो आयु, लोस्ते आणि अन्नपूर्णा यांसारखे 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे महत्त्वपूर्ण शिखर सर केले. त्यानंतर 1994 मध्ये म्हणजेच वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी माऊंट ऐव्हरेस्ट सर केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI