अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर नेटकऱ्यांचा टीकेचा बॉम्ब

अभिनेता अक्षय कुमार  (Akshay kumar) याच्या वेगळ्या गेटअपने लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाची चर्चा होत असतानाच सोशल मीडियावर मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे.

अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'वर नेटकऱ्यांचा टीकेचा बॉम्ब

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार  (Akshay kumar) याच्या वेगळ्या गेटअपने लक्ष्मी बॉम्ब ( Lakshmi Bomb) या सिनेमाची चर्चा होत असतानाच सोशल मीडियावर मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या सिनेमावर टीका करतानाच अक्षयलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाचे शिर्षक आणि त्यातील पात्रांच्या नावावरून सोशल मीडियावर हा राडा सुरू असून ट्विटरवर #ShameOnUAkshayKumar हा हॅशटॅगही सुरू करण्यात आला असून हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्येही आला आहे.(Netizens criticize Akshay kumars Lakshmi Bomb)

या सिनेमात अक्षयने असिफ नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. तर कियारा अडवाणी पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारत आहे. या सिनेमात असिफचे पूजावर प्रेम दाखविण्यात आले आहे..त्यामुळे या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा नेटकऱ्यांचा समज झाला असून त्यामुळे त्यांनी या सिनेमासह अक्षयलाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून माता लक्ष्मीच्या नावाचा गैरवापर करून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ची कथा काय?

‘लक्ष्मी बॉम्ब’मधील हा नायक भूतांवर विश्वास न ठेवणारा आहे. भारतात तो त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला भेटायला आला आहे. इथे लोकांची भूतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भूतं नसतात. भूतं असतील तर मला दिसतील तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा हा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागतात. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेल घरचे अनेक उपाय करतात. सिनेमात पुढे आणखी काय काय घडते हे तुम्ही प्रत्यक्ष सिनेमाच पाहिल्यावर कळेल.

संबंधित बातम्या : 

 ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

(Netizens criticize Akshay kumar s Lakshmi Bomb)

Published On - 7:18 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI