‘नागपूर मनपाची सर्व वाहनं 6 महिन्यात CNG करा’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूर महापालिकेला सूचना

| Updated on: Nov 09, 2020 | 8:51 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेला महत्वाची सूचना केली आहे. पुढील सहा महिन्यात नागपूर महानगरपालिकेकडे असलेली सर्व वाहनं CNG करा अशी सूचना त्यांनी केली आहे

नागपूर मनपाची सर्व वाहनं 6 महिन्यात CNG करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपूर महापालिकेला सूचना
Follow us on

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी नागपूर महापालिकेला महत्वाची सूचना केली आहे. पुढील सहा महिन्यात नागपूर महानगरपालिकेकडे असलेली सर्व वाहनं CNG करा अशी सूचना त्यांनी केली आहे. अगदी महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांपर्यंत सर्व गाड्या CNGवर करा, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. त्यासाठी CNG फिलिंग सेंटर उभ्यारण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. पर्यावरण हित आणि आर्थिक नियोजनासाठी गडकरी यांना महापालिकेला हा मोलाचा सल्ला देऊ केलाय. (Central minister Nitin Gadkari suggests to nagpur municipal corporation to put all vehicles on CNG)

नागपूर महानगरपालिकेला कोरोनाचा मोठा फटका

कोरोना संकटामुळे राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. नागपूर महानगरपालिकाही मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या काळात नागपूर महापालिकेचं तब्बल 274 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न घटलं आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि बाजार नगररचना करातही घट झाली आहे. कोरोनामुळे शासकीय अनुदान घटल्याने मनपासमोर मोठं आर्थिक संकट उभं झालं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 274 कोटी 59 लाख रुपये उत्पन्न घटलं. गेल्या वर्षी याच पाच महिन्यात 1019 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता, पण यावर्षी कोरोनामुळे अवघे 744 कोटी 95 लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेली सूचना आमलात आल्यास नागपूर महापालिकेच्या खर्चात मोठी कपात होण्यास मदत होणार आहे.

CNGचे वाहनाचे फायदे

कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात CNGवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठी इंधनबचत होते. त्याचबरोबर प्रदुषणालाही आळा बसतो. इलेक्ट्रिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षाही CNG वाहनांचे प्रदूषण खूप कमी असते. त्यामुळे तज्ञांकडून CNG वाहनांचा वापर वाढवण्याचं आवाहन सातत्याने करण्यात येत असतं.

CNG आणि LPG गॅस मधील फरक

CNG आणि LPG मधील महत्वाचा फरक हा आहे की CNG मध्ये प्रामुख्याने मिथेन वायू असतो. तर LPG मध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन असतो. CNG हा वायू स्वरुपात असतो, तर LPG हा द्रव स्वरुपात पाहायला मिळतो.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे नागपूर मनपावर आर्थिक संकट, उत्पन्न 274 कोटींनी घटलं

तब्बल 219 दिवसांनंतर ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

Nitin Gadkari suggests to nagpur municipal corporation to put all vehicles on CNG