नितीन गडकरींचा अभिनव उपक्रम, खादीचे चप्पल-बूट लाँच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी खादीची चप्पल आणि बूट लॉन्च केले आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी MSME मंत्रालयाकडून नवा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

नितीन गडकरींचा अभिनव उपक्रम, खादीचे चप्पल-बूट लाँच

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलंय. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी खादीची चप्पल आणि बूट लॉन्च केले आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी MSME मंत्रालयाकडून नवा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. (Nitin Gadkari lauch khadi Shoes and Chappal)

देशाच्या विविध भागात खादीचे कपडे, मास्क आणि अन्य साहित्यांची सणउत्सव काळात रेलचेल आहे. अशातच नव्या ट्रेंडनुसार येऊ घातलेल्या सणासुदीच्या काळात लोकांची खादीला पसंती असते. हीच संधी हेरुन गडकरींनी खादीची चप्पल आणि बूट बाजारात आणले आहेत. हे बूट आणि चप्पल नक्कीच लोकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे.

नव्या ट्रेंडनुसार लोक खादीचे कपडे पसंत करतात. आता आम्ही खादीची चप्पल आणि बूट दोन्ही बाजारात आणले आहेत. पुरुष आणि महिला वर्गासाठी दोन्ही वस्तू उपलब्ध असतील जे लोकांच्या पसंतील पडतील, असं गडकरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सण-महोत्सवाच्या काळातलोकांना स्थानिक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. ‘मन की बात’मध्ये बोलताना, खादी आता जगात एक ओळख बनवत आहे, तसेच ते फॅशन स्टेटमेंट बनले आहे, असं मोदी म्हणाले होते. तसंच याच संबोधनात बोलताना त्यांनी खादीच्या वाढलेल्या विक्रीबद्दल भाष्य केलं होतं.

‘लोकल फॉर व्होकल’चा पंतप्रधानांचा नारा

आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधीकाळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केली. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे ते वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनले. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपला देश असं करु शकतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा मंत्र दिला होता.

(Nitin Gadkari lauch khadi Shoes and Chappal)

संबंधित बातम्या

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा

‘व्होकल फॉर लोकल’ ते एक दिवा सैनिकांसाठी लावा; मोदींची ‘मन की बात’

PM Narendra Modi | मन की बात | प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा, पंतप्रधानांचं आवाहन

Published On - 5:35 pm, Mon, 26 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI