PM Narendra Modi | मन की बात | प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा, पंतप्रधानांचं आवाहन

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणार कार्यक्रम हा 70 वा असणार आहे.

PM Narendra Modi | मन की बात | प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा, पंतप्रधानांचं आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (25 ऑक्टोबर) मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केलं. मोदींचा हा 70 वा मन की बात  कार्यक्रम आहे. सकाळी 11 वाजता मोदींनी देशवासीयांना संबोधित केलं असून, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आज ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणारा कार्यक्रम हा 70 वा होता. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरून ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं होतं. तसेच त्यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या.

LIVE

Picture

पंतप्रधानांचा पोन मरियप्पन यांच्याशी तामिळ भाषेत संवाद

पोन मरियप्पन हे तामिळनाडूतील तुतुकुडीमध्ये एक सलून चालवतात, त्यांनी त्यांच्या सलूनचा एक भाग पुस्तकालयात परिवर्तित केला आहे. त्यांच्याशी पंतप्रधानांनी पोन यांच्याशी तामिळ भाषेत संवाद साधला

25/10/2020,11:22AM
Picture

भारतातील मल्लखांब विदेशात फेमस - पंतप्रधान

भारतातील मल्लखांब विदेशात फेमस आहे. अनेक देशांमध्ये आता हा खेळ खेळला जातो, त्याची विश्व चॅम्पियनशिपही होते. तसेच योगाचाही विदेशात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे

25/10/2020,11:14AM
Picture

मेक्सिकोत खादीची निर्मिती - पंतप्रधान

खादीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. मेक्सिकोत खादीला मोठी मागणी, मेक्सिकोत खादीची निर्मिती, महात्मा गांधींच्या सिनेमामुळे प्रभावित होऊन मेक्सिकोत युवकाचा खादी व्यवसाय

25/10/2020,11:12AM

Picture

प्रत्येक घरात वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावा - पंतप्रधान

सणांमध्ये सीमेवर असलेल्या सैनिकांनाही लक्षात ठेवा. आम्हाला प्रत्येक घरात या वीर जवानांच्या सन्मानासाठी एक दिवा लावायचा आहे

25/10/2020,11:08AM
 

Picture

कोरोना काळात सतर्कता बाळगा - पंतप्रधान

यंदा खरेदी करताना लोकल फॉर व्होकलला लक्षात ठेवा, कोरोना काळात सतर्कता बाळगा, स्वदेशीला प्राधान्य द्या

25/10/2020,11:05AM
Picture

पंतप्रधानांकडून विजयादशमीच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमीच्या भरभरुन शुभेच्छा  

25/10/2020,11:04AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *