AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Be Vocal for Local).

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा', पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 12, 2020 | 10:39 PM
Share

नवी दिल्ली : “देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं (Be Vocal for Local) खरेदी करावं. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय लोकल वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. लोकल उत्पादनाचा प्रसार करा”, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे) पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनतेला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या (Be Vocal for Local).

“आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधीकाळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि ब्रँण्डींग केली. याशिवाय त्या वस्तूंप्रती अभिमान बाळगला. त्यामुळे ते वस्तू आणि लोकलहून ग्लोबल बनले. त्यामुळे दररोज प्रत्येक नागरिकाने आपल्या लोकलसाठी व्होकल बनायचं आहे. लोकल वस्तू खरेदी करुन त्याचा प्रचार करा. मला पूर्ण विश्वास आहे आपला देश असं करु शकतो”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“कोरोना संकंटादरम्यान आपल्याला लोकल उत्पादन, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन याचंही महत्त्व समजलं आहे. संकंट काळात लोकलनेच आपली मागण्यांची पूर्तता केली आहे. आपल्याला या लोकलनेच वाचवलं आहे. लोकल फक्त गरजच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकलला आपला जीवनमंत्र बनवावंच लागेल, हे आता वेळेने आपल्याला शिकवलं आहे”, असं मोदी म्हणाले.

“हे संकंट इतकं मोठं आहे की, चांगल्यातली चांगली आणि मोठी व्यवस्थाही हादरली आहे. मात्र, याच परिस्थितीत देशाने गरिब भारतीयांची संघर्ष शक्ती बघितली आहे. या परिस्थितीत त्यांच्या संयमतेचंही दर्शन घडलं आहे. खासकरुन रस्त्यावर ठेला लावणारे, फेरीवाले, अनेक घरांमध्ये काम करणाऱ्या श्रमिक नागरिकांनी खूप सोसलं आहे. त्यांनी खूप त्याग केला आहे. प्रत्येकाला त्यांची कमी जाणवली. आपल्याला त्यांना सुदृढ बनवायचं आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“याच गोष्टीचा विचार करुन गरिब, श्रमिक, स्थलांतरित मजूर, पशूपालक, मच्छिमार, संघटित क्षेत्रातील असो किंवा असंघटित क्षेत्रातील असो सर्वांसाठी आर्थिक पॅकजमध्ये महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“भारताने ग्लोबल सप्लाय चेनमध्ये महत्त्वाची भूमिका निभवावी, याच गोष्टीचा विचार करुन आर्थिक पॅकेजमध्ये अनेक गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजमुळे प्रत्येक क्षेत्रातील वस्तूंच्या उत्पादनात गती मिळेल आणि गुणवत्ताही वाढेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

Aatm Nirbhar Bharat : पंतप्रधान मोदींनी सांगितले स्वावलंबी भारताचे पाच खांब

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार 

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?