Aatm Nirbhar Bharat : पंतप्रधान मोदींनी सांगितले स्वावलंबी भारताचे पाच खांब

स्वावलंबी भारताची भव्य इमारत ही पाच स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ हा अर्थव्यवस्था आहे. दुसरा स्तंभ हा पायभूत सुविधा आहे.

Aatm Nirbhar Bharat : पंतप्रधान मोदींनी सांगितले स्वावलंबी भारताचे पाच खांब
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 9:44 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणू आणि देशातील लॉकडाऊनच्या (Aatm Nirbhar Bharat) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन – 3 चा कालावधी आता काही दिवसांनी म्हणजेच 17 मे रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (12 मे) पंतप्रधानांनी देशातील जनतेला संबोधित करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘लॉकडाऊन – 4’ची घोषणाही केली. तसेच, ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा (Aatm Nirbhar Bharat) देशाला दिला.

पाच स्तंभांवर स्वावलंबी भारताची इमारत उभी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

21 वं शतक हे हिंदुस्तानचं आहे. कोरोना संकंटा नंतरही जगभरात जे घडत आहे ते आपण बघत आहोत. दोन्ही कालखंडाला भारताच्या नजरेने बघितलं तर जाणवतं की, 21 वं शतक भारताचं असावं. हे आपलं स्वप्नच नाही तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. जगभरातील परिस्थिती बघता यावर एकच मार्ग आहे, स्वावलंबी भारत”, असं मोदी म्हणाले. पाच स्तंभांवर स्वावलंबनाची इमारत उभी आहे, असं मोदी म्हणाले.

मोदींनी सांगितलेले स्वावलंबनाचे पाच स्तंभ कोणते?

? स्वावलंबनाचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था

? स्वावलंबनाचा दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा

? स्वावलंबनाचा तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था

? स्वावलंबनाचा चौथा स्तंभ आपली लोकशाही

? स्वावलंबनाचा पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र

Aatm Nirbhar Bharat

“स्वावलंबी भारताची भव्य इमारत ही पाच स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ हा अर्थव्यवस्था आहे. दुसरा स्तंभ हा पायभूत सुविधा आहे. तिसरा स्तंभ आपली तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था आहे, जी 21 व्या शतकाच्या स्वप्नांना साकार करणारी आहे. चौथा स्तंभ म्हणजे लोकशाही. लोकशाही आपली ताकद आहे. स्वावलंबी भारतासाठी लोकशाही ऊर्जाचा स्त्रोत आहे. पाचवा स्तंभ पुरवठ्याचे चक्र आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्याची जी साखळी आहे, त्याचा पूर्ण क्षमतेनुसार वापर करण्याची जास्त आवश्यकता आहे. मागणी वाढवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचं सशक्त असणं गरजेचं आहे. आपली पुरवठा करणारी साखळी व्यवस्थेला मजबूत करणार. यामध्ये भारताच्या मातीचा आणि भारतीय मजुरांच्या घामाचा सुगंध असणार आहे”, असं म्हणत मोदींना देशातील जनतेला ‘स्वावलंबी भारत’चा (Aatm Nirbhar Bharat) नारा दिला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.