AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन 'स्वावलंबी भारत' संकल्पाचा नारा दिला. (PM Narendra Modi self reliance )

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी
| Updated on: May 12, 2020 | 9:20 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा दिला. (PM Narendra Modi self reliance India) कोरोनामुळे जग संकटात आहे, मात्र या संकटासमोर शरण पत्करेल तो मानव कसला. २१ वं शतक भारताचं आहे. कोरोनाच्या या संकटाचं रुपांतर संधीत करुन भारताला स्वावलंबी बनवू असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज आहे. (PM Narendra Modi self reliance India)

#Lockdown4 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या लॉकडाऊनचे नियम 18 मे पूर्वी जाहीर करणार, चौथा लॉकडाऊन नव्या नियमांसह असेल असं मोदी म्हणाले.

जगभरात कोरोनाविरोधात लढाई सुरु होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. या दरम्यान 42 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. 3.75 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक परिवारांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे. मी सगळ्यांप्रती संवेदना व्यक्त करतो, असं मोदी म्हणाले.

मोदींचं संपूर्ण भाषण

एका विषाणूने संपूर्ण जग हलवलं आहे. कोट्यवधी लोक संकंटाचा सामना करत आहेत. संपूर्ण जग लढाई लढत आहे. अशाप्रकारचे संकंट याआधी कधीच बघितलं नव्हतं आणि ऐकलही नव्हतं. मानव जातीसाठी हे सर्व कल्पनेच्या पलीकडील आहे. मात्र, संकंटाशी सामना करताना मागे हटणं हे मानवाचा धर्म नाही.

नियमांचं पालन करुन आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे आणि पुढे जायचं आहे. आपल्याला आपला संकल्प आणखी मजबूत करायला हवा. आपला संकल्प या संकंटापेक्षाही मोठा आहे.

21 वं शतक हे हिंदुस्तानचं आहे. कोरोना संकंट नंतरही जगभरात जे घडत आहे ते आपण बघत आहोत. दोन्ही कालखंडाला भारताच्या नजरेने बघितलं तर जाणवतं की, 21 वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर आपली सर्वांची जबाबदारी आहे.

जगभरातील परिस्थिती बघता यावर एकच मार्ग आहे. स्वावलंबी भारत हा एकमेव मार्ग आहे.

हे संकट भारतासाठी संधी

हे संकट भारतासाठी एक संकेत, संदेश आणि संधी घेऊन आलं आहे. जेव्हा कोरोना संकंट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई कट तयार केलं जात नव्हतं. N 95 मास्कचं भारतात फारसं उत्पादन केलं जात नव्हतं. मात्र, आज भारतात दररोज 2 लाख पीपीई किट्स आणि N 95 मास्क तयार केलं जात आहे. भारताने संकंटाला संधीत बदललं म्हणून हे शक्य झालं. भारताच्या संकटाला संधीत बदलण्याच्या दृष्टीकोणास स्वावलंबी भारतच्या संकल्पासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

जग हे परिवार आहे. भारताच्या स्वावलंबामध्ये संसारचं सुख, सहकार्य आणि शांतीची चिंता असते. जी संस्कृती जगावर विश्वास ठेवते, जगाचं कल्याण व्हावं अशी आशा बाळगते, संपूर्ण जगाला परिवार मानते, जी पृथ्वीला आई मानते, ती संस्कृती जेव्हा स्वावलंबी बनते तेव्हा तिच्यामार्फत सुखी, समृद्ध विश्वाची संभावनादेखील सुनिश्चित असते.

मानव जातीच्या कल्याणासाठी भारताचं योगदान

भारताच्या प्रगतीत नेहमी जगाची प्रगती सामावलेली आहे. भारताचे कार्याचा प्रभाव विश्वकल्याणवर पडतो. भारताच्या कार्यामुळे जगाची परिस्थिती बदलते. टीबी, कुपोषण, पोलिओ असो भारताच्या अभियानाचा प्रभाव जगावर पडतोच. जीवन आणि मृत्यू संघर्ष करत असलेल्या दुनियेत भारताच्या औषधी एक नवी आशा घेऊन पोहोचतात. जगभरात भारताची प्रशंसा होते. प्रत्येक भारतीय गर्व बाळगतो. जगाला विश्वास बसला आहे की, भारत खूप चांगलं काम करणार आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी भारत खूप चांगलं काही देऊ शकतो.

130 कोटी स्वावलंबी भारताच्या संकल्पनेने ते शक्य होणार आहे. आपला गौरवपूर्ण इतिहास राहिला आहे. भारताला ‘सोने की चिडीया’ म्हटलं जायचं. भारत संपन्न होता तेव्हाही जगाच्या कल्याणाच्या मार्गानेच चालला. मात्र, नंतर देश गुलामीत जखडला गेला. आम्ही विकासासाठी चाचपडत होतो. आज पुन्हा भारत विकासाच्या दिशेने यशस्वीपणे पाऊल टाकत आहे. तरीही जगाच्या कल्याणासाठी काम करणार आहे.

Y2 संकट

21 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतावर ‘वाय टू’चं संकंट आलं होतं. भारताच्या टेक्नॉलॉजी एक्सपर्टने त्या संकंटातून बाहेर काढलं होतं. आज आपल्याजवळ साधन, सामर्थ्य आहे. आपण खूप चांगलं उत्पादन काढू. हे आपण करु शकतो आणि जरुर करु.

मी माझ्या डोळ्यांसमोर कच्छ-भूज येथील भूकंप पाहिला. सगळं उद्धवस्त झालं होतं. कच्छ मृत्यूची चादर पांघरुन झोपलं आहे असं वाटत होतं. मात्र, कच्छ त्या संकंटातून उठला. हीच भारतीयांची संकल्प शक्ती आहे. आपण एकदा ठरवलं तर काहीच अशक्य नाही. कुठलीच वाट कठीण नाही. आतातर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. भारत स्वावलंबी बनू शकतं.

स्वावलंबी भारताचे पाच खांब

स्वावलंबी भारताची भव्य इमारत पाच खांबावर उभी आहे. पहिला खांब हा अर्थव्यवस्था आहे. दुसरा खांब हा पायभूत सुवधा आहे. तिसरा खांब आपली व्यवस्था आहे, जी 21 व्या शतकाच्या स्वप्नांना साकार करणारी आहे. चौथा खांब म्हणजे लोकशाही. लोकशाही आपली ताकद आहे. स्वावलंबी भारतसाठी लोकशाही ऊर्जाचा स्त्रोत आहे. पाचवा खांब डिमांड अर्थात मागणी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत डिमांड म्हणजे मागणी आणि सप्लाय अर्थात पुरवठा जी साखळी आहे तिला पूर्ण क्षमतेनुसार वापर करण्याची जास्त आवश्यकता आहे. मागणी वाढवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचं सशक्त असणं जरुरीचं आहे. आपला पुरवठा करणारी साखळी व्यवस्थेला मजबूत करणार. यामध्ये भारताच्या मातीचा आणि भारतीय मजुरांच्या घामाचा सुगंध असणार आहे.

20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज

कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार मी आज विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल.

नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या, जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.

देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गींयांसाठी आहे. या आर्थिक पॅकेजबाबत लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असं मोदी म्हणाले.

गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.

(PM Narendra Modi self reliance India)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.