तब्बल 219 दिवसांनंतर ‘आपली बस’ प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूरकरांची 'आपली बस' आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.

तब्बल 219 दिवसांनंतर 'आपली बस' प्रवाशांच्या सेवेत; नागपूरकरांना दिलासा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूरकरांची ‘आपली बस’ (Aapli bus) आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मनपा प्रशासनाने त्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर परिवहन समितीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी ही बससेवा 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. (Nagpur : After 219 days Aapli bus is in passengers service)

कोरोनामुळे ही बससेवा तब्बल 219 दिवस बंद होती. आजपासून पाच मार्गांवर 40 बसेस धावतील. बुटीबोरी, खापरखेडा आणि हिंगणा या मार्गांवर सर्वाधिक बसेस धावतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेसची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती परिवहन समितीने दिली आहे. लॉकडाऊनपूर्वी शहरातील 111 मार्गांवर 361 बस चालविण्यात येत होत्या. या मार्गांवर तब्बल तीन हजार 551 फेऱ्या सुरु होत्या. याद्वारे 1.5 लाख नागरिक दररोज प्रवास करत होते.

नागपूर महानगरपालिका आधीच आर्थिक संकटात आहे. शहरात आजपासून ‘आपली बस’ सुरु झाल्याने या संकटात आणखी भर पडणार आहे. कारण ‘आपली बस’चा दर महिन्याला सहा ते सात कोटी रुपयांचा तोटा आहे. कोरोनामुळे तब्बल 219 दिवस बससेवा बंद होती, त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण मनपाच्या तिजोरीवर येत नव्हता, पण आजपासून नागपूर शहरात बससेवा सुरु झाली आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवरील ताण वाढणार आहे.

राज्यातील बहुतांश शहरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहरातदेखील बससेवा सुरु आहे. परंतु नागपूर प्रशासन यासंदर्भात निर्णय घेत नव्हतं, त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी होती. अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी यासंदर्भात सातत्याने मागणी केली आहे. अखेर प्रशासनाला ही मागणी मान्य करत आपली बस सुरु करावी लागली आहे.

आजपासून बससेवा झाली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रवाशांना प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. सुरक्षित अंतर व मास्क लावणे, सॅनिटायजेशन अशा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

संबंधित बातम्या

नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे यांची नियुक्ती

नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

(Nagpur : After 219 days Aapli bus is in passengers service)

Published On - 10:53 am, Wed, 28 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI