नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्यासमोर मेट्रोच्या भ्रष्टाचाराचं प्रदर्शन लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (NCP demand to inquire Nagpur Metro scam)

नागपूर मेट्रोत 2500 कोटींचा घोटाळा, CBI आणि  ED कडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

नागपूर : नागपूर मेट्रोच्या 2500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची CBI, ED द्वारे चौकशी करावी,ठ अशी मागणी जय जवान जय किसानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने केली आहे. महाविकासआघाडी सरकारनेही मेट्रोच्या घोटाळ्याची चौकशी करावी, असेही राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्यासमोर मेट्रोच्या भ्रष्टाचाराचं प्रदर्शन लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (NCP demand to inquire Nagpur Metro scam)

“पी. चिदंबरम आणि आता डॉ. फारुख अब्दुला यांच्यावर क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असताना कथित 44 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला म्हणून ईडीची नोटीस पाठवली आहे. पण भाजप कोणत्याही नेत्यांवर कारवाी करण्यास टाळत नाही. केंद्र सरकारच्या ज्या-ज्या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्या ठिकाणी साधी चौकशी होत नाही. उलट त्यांना क्लिन चीट देऊन भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिली जाते.”

“आघाडी सरकार मात्र नागपुरातील मेट्रो रेल्वेमध्ये सुमारे 2500 कोटी रुपयाचा अपहार झाला. याबाबत अनेक पुरावे सादर केले आहे. मात्र याची केवळ साधी चौकशी लावत ब्रिजेश दीक्षित यांनी सर्व बरोबर मॅनेज केले आहे का?,” असा सवाल ही राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी उपस्थित केला आहे.

“जय जवान जय किसान संघटना सातत्याने मेट्रो रेल्वेच्या आर्थिक गैरव्यवहारावर आवाज उठवला आहे. मात्र सुमारे 2500 कोटीच्या गैरव्यवहाराची साधी चौकशीसुद्धा सुरु केली तरी ब्रिजेश दीक्षित हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.”

“विधानसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत मेट्रोमधील आर्थिक गैरव्यवहाराची माहिती दिली होती. आता राज्यात आघाडी सरकार आहे, त्यांनी लवकरात लवकर गैरव्यवहाराची चौकशी करावी,” अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे. (NCP demand to inquire Nagpur Metro scam)

संबंधित बातम्या : 

आता तुम्ही हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलात; नवाब मलिकांचा फडणवीसांवर घणाघात

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *