Internet Wifi | स्टेशनवर आहेच, आता डब्यातही मिळणार! रेल्वेची प्रवाशांना वायफाय खूशखबर

| Updated on: Dec 19, 2021 | 11:25 AM

अनेकदा मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवते. अनेक स्थानकांच्या मध्ये मोबाईलचं नेटवर्क आणि इंटरनेट अचानक काम करेनासं होऊन जातं. मात्र या समस्येवर आता कायमस्वरुपी तोडगा निघण्याची शक्यता दाट झाली आहे.

Internet Wifi | स्टेशनवर आहेच, आता डब्यातही मिळणार! रेल्वेची प्रवाशांना वायफाय खूशखबर
Mumbai Local
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात मुंबईकरांना लोकलमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लोकलमध्ये हाय कॅपेसिटी वाय-फाय राऊटर बसवण्यात येणार असल्याची माहिती मसलोर आली आहे. त्यामुले गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या प्रकल्पाला 2022 या वर्षात सुरुवात केली जाईल. त्यामुळे नेटवर्कच्या समस्येनं त्रस्त असलेल्या मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेकदा मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवते. अनेक स्थानकांच्या मध्ये मोबाईलचं नेटवर्क आणि इंटरनेट अचानक काम करेनासं होऊन जातं. मात्र या समस्येवर आता कायमस्वरुपी तोडगा निघण्याची शक्यता दाट झाली आहे. नवीन वर्षात रेल्वेकडून मुंबई लोकल डब्यात वायफाय लावण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगतलं जातंय.

स्टेशनसोबतच आता डब्यातही

रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा रेल्वेनं आधीच दिली होती. मात्र मुंबई लोकलच्या डब्यांमध्येही आता रेल्वे वायफाय सुविधा देणार असल्यानं प्रवाशांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. धावत्या लोकलमध्ये वाय-फाय सुविधा मिळाल्यास सध्याच्या ऑनलाईन जगात लोकांना अवितरपणे इंटरनेट वापरता येऊ शकणार आहे.

इंटरनेट

सुरुवातील मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील 3 हजार 465 डब्यांमध्ये वायफाय सुविधा इन्स्टॉल केली जाणार आहे. एका खासगी कंपनीला यासाठीचं काम देण्यात आलं आहे. लोकलमधील गर्दी पाहता एका वेळी अनेकांना कनेक्टिव्हिटी मिळावी, म्हणून शक्तिशाली राऊटर लोकलमध्ये बसवण्यात येणार आहेत. मात्र त्यांची क्षमता नेमकी किती आहे, हे प्रत्यक्ष वापरानंतर कळू शकेल. पण रेल्वेच्या वायफाय सुविधेमुळे प्रवाशांचा नेटवर्क इश्यू मिटेल, हे नक्की. आता हे काम नव्या वर्षात कधी पूर्ण होतं, याकडे रेल्वे प्रवाशांची नजर लागली आहे.

मोफत असणार की पैसे घेतले जाणार?

रेल्वेची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवनवे उपक्रम रेल्वे प्रशासनाकडून राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून ही वायफाय सेवेचाही प्रयोग करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, लोकलमध्ये देण्यात येणारी वायफास सुविधा वापरायची कशी, ती मोफत असणार का, याबाबत अधिक माहिती अजून समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ – 

इतर बातम्या – 

नाताळ, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम टाळा, मुंबई महापालिकेचं आवाहन; नव्या सूचना जारी

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास….