AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात पडलेले तीन खून, त्यानंतरच्या तीन दरोड्यानंतर आता नाशिकमध्ये एका महिला वकिलाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरून पेट्रोलहल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे.

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा...गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 10:07 AM
Share

नाशिकः पर्यटननगरी, उद्योगनगरी, अध्यात्मनगरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकची झपाट्याने सुरू असलेली क्राईमनगरीकडील वाटचाल थांबताना दिसत नाही. अंधेर नगरी चौपट राजा, अशी शहराची सध्या तरी अवस्था झालेली दिसत आहे. कारण गेल्या महिन्यात एकाच आठवड्यात पडलेले तीन खून, त्यानंतरच्या तीन दरोड्यानंतर आता नाशिकमध्ये एका महिला वकिलाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरून पेट्रोलहल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. नवीन सीबीएस ठक्ठर बाजारात घडलेल्या या प्रकाराने शहरवासीय पुन्हा एकदा हादरून गेले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

अशी घडली घटना

नाशिकमधील ठक्कर बाजार भागात अॅड. अलका श्रीकांत मोरे-पाटील (वय 40, रा. राजीवनगर) यांचे ऑफिस आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपले काम संपवले. त्या घरी जायला बाहेर पडल्या. तेव्हा त्यांना अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्याने घेरले. त्यांच्याशी सुरुवातीला झटापट केली. यात त्या खाली पडल्या. तेव्हा टोळक्याने त्यांच्या अंगावर पेट्रोलसदृश्य पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासोबत प्रशिक्षार्थी म्हणून काम करणाऱ्या सहकारी जयश्री तुलसीदार महाले या त्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी आणि इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा या टोळक्याने अॅड. अलका मोरे यांना बघून घेण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत पोबारा केला. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

का केला हल्ला?

अॅड. अलका मोरे या छावा जनक्रांती संघटनेचे काम पाहतात. त्यांनी तळावाडे येथील ग्रामपंचायतीतील गैरकारभाराचे बिंग फोडले. त्यामुळे संबंधितांनी आपल्यावर हल्ला केला. धमकी दिली, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकाराने परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. नाशिकमध्ये गेल्या महिन्यात पडलेले तीन खून, तीन दरोडे आणि त्यानंतर आता झालेला हा प्रकार. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस इतके थंड कसे?

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, पोलिसांचे म्हणावे तितके लक्ष दिसत नाही. पोलीस आयुक्त फक्त हेल्मटसक्तीची मोहीम राबवताना दिसत आहेत. त्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या अशा गुंडांच्या मुसक्या आवळाव्यात. कोम्बिग ऑपरेशन राबवून नागरिकांची या भीतीतून सुटका करावी. एकीकडे खून आणि दरोडे पडत असताना पोलीस इतके कसे काय थंड राहू शकतात, असा सवाल आता चीडून सर्वसामान्यांच्या ओठी येताना दिसत आहे.

इतर बातम्याः

Nashik | कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…

Nashik| कृषी पर्यटन धोरणात शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी; काय आहे पात्रता, कशी कराल नोंदणी, घ्या जाणून..!

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.