AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ देशाच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो लीक, जाणून घ्या नक्की काय घडलं?

राजाची गर्लफ्रेंड असलेल्या सीनीत वोंगवजिरापकडी यांचे तब्बल 1 हजार फोटो लीक झाल्याचा प्रकार थाडलंडमध्ये घडला आहे. (photo Thailand kings girlfriend)

'या' देशाच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो लीक, जाणून घ्या नक्की काय घडलं?
| Updated on: Dec 22, 2020 | 10:57 PM
Share

बँकॉक : थायलँडचे राजा महा पवजिरालोंगकोर्न (Maha Vajiralongkorn) यांची गर्लफ्रेंड सीनीत वोंगवजिरापकडी (Cinit Wongvajirapakdi) यांचे तब्बल 1 हजार फोटो लीक झाल्याचा प्रकार घडला आहे. thetimes.co.uk यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, यातील शेकडो फोटो हे न्यूड आहेत. राजाची पत्नी सुथिडा आणि गर्लफ्रेंड सीनीत यांच्यात गेल्या कित्येक काळापासून भांडणं सुरु असल्याची चर्चा आहे. याच भांडणातून पत्नी सुथिडानं हे फोटो लीक केल्याचं बोललं जात आहे. सुथिडा या सध्या थाडलँडची राणी आहेत. (nude photo of Thailand kings girlfriend has been leaked)

गर्लफ्रेंड कारागृहातून बाहेर येताच फोटो लीक

सीनीत हीला थायलँडचे राजा महा पवजिरालोंगकोर्न यांची गर्लफ्रेंड म्हटलं जातं. त्यांच्यातील नातं जगजाहीर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सीनीतला अचानक गजाआड करण्यात आलं. तिच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्या कित्येक दिवस कारागृहात बंद होत्या. मात्र, आता सीनीत यांना मुक्त करण्यात आलं आहे. मात्र, कारागृहातून बाहेर येताच सीनीत यांचे हजारो फोटो लीक झाले आहेत.

राजाच्यां गर्लफ्रेंडनेच क्लिक केलेले शेकडो सेल्फी

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सीनीत यांचे सगळे न्यूड फोटो हे एका आंदोलनकर्त्याला पाठवण्यात आले. थायलंडमधील राजेशाहीविरोधात सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर हे फोटो पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे. हे सगळे फोटो 2012 ते 2014 दरम्यान खुद्द सीनीत यांनीच काढले असल्याची माहिती आहे. तसेच, सध्या थायलंडच्या राजेशाहीविरोधात ब्रिटीश पत्राकर मॅकग्रेगर मार्शल यांनी आवाज उठवला आहे. यांनाही सीनीत यांचे फोटो पाठवण्यात आले आहेत.

68 वर्षाच्या राजाचे आतापर्यंत 3 लग्न

थायलंडच्या राजाचं वय सध्या 68 वर्ष आहे, ज्यांनी 2019 मध्ये सुथिडा यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर सुथिडा यांना राणीचा दर्जा मिळाला. राजानं याआधी 3 लग्न केलेली आहेत, आणि त्याला 7 मुलं आहेत. मात्र, मागील 3 बायकांसोबत त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

42 वर्षांची राणी, 35 वर्षांची गर्लफ्रेंड

राजाची पत्नी सुथिडा ही 42 वर्षांची आहे, तर गर्लफ्रेंड 35 वर्षांची आहे. या दोघीही राजाच्या महालात सिनीअर अधिकारी म्हणून काम करत होत्या. तिथंच राजा त्यांच्या प्रेमात पडला. सुथिडा याआधी थाय एअरवेजमध्ये फ्लाईट क्रू म्हणून काम करत होत्या, तर सीनीत हा थायलंडच्या सैन्यात नर्स म्हणून काम करत होत्या.

दरम्यान, राजाच्या गर्लफ्रेंडचेच फोटो लीक झाल्यामुळे थायलंडमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. हे फोटो थायलंडच्या राणीने लीक केल्याचे म्हटले जात आहे.

संबधित बातम्या :

कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड, भारतीय तरुणाला दुबईत सात कोटींची लॉटरी

जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या कंपनीतून हिरे लंपास; नीरव मोदीच्या भावाचा न्यूयॉर्कमध्ये फ्रॉड

(nude photo of Thailand kings girlfriend has been leaked)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.