मालेगावातून आणखी एका बांग्लादेशी नागरिकाला अटक, मदत करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल

पवारवाड़ीच्या भागात राहत हा बांग्लादेशी नागरिक राहत होता. त्याला मदत करणाऱ्या आणखी 6 लोकांनावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मालेगावातून आणखी एका बांग्लादेशी नागरिकाला अटक, मदत करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 10:28 PM

मालेगाव : मालेगावामधून आणखी एका बांग्लादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आज दिवसभरात 2 बांग्लादेशी नागरिक मालेगावातून पकडण्यात आले. पवारवाड़ीच्या भागात राहत हा बांग्लादेशी नागरिक राहत होता. त्याला मदत करणाऱ्या आणखी 6 लोकांनावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मालेगावात बनाबट पासपोर्टचं मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. (one more Bangladeshi national arrested from Malegaon)

पोलिसांनी बांग्लादेशी नागरिकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यासोबत आणखी कोणी परिसरात आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी मुंबईच्या साकीनाका परिसरातूनही पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या दोघांची तपासणी केली असता या दोघांनी वेगवेगळ्या मोबाईलमधून ॲपद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून बांगलादेशात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधल्याचे पुरावे मिळाले. यानंतर पोलिसांनी पारपत्र कायद्यातंर्गत दोघांवरही गुन्हा दाखल केला.

या दोन्ही बांगलादेशी नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, एका एजंटकडून त्यांची मुंबईत राहण्याची सोय करण्यात आली होती. तसेच भारतीय नागरिक असल्याची बनावट ओळखपत्रे तयार करण्यासाठी याच एजंटने मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित एजंटला ताब्यात घेऊन त्याचीही चौकशी केली.

त्याने सांगितले की, तो बांगलादेशी नागरिकांचे आधार कार्ड व त्यानंतर पासपोर्ट असे नाशिक मालेगाव येथील एजंट यांच्याकडून बनवून घेत असे. त्यावरून पोलिसांनी मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणच्या एका एजंटला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देखील बांगलादेशी नागरिकाचा एक भारतीय पासपोर्ट मिळाला.

पोलिसांनी मालेगाव इथल्या एजंटच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडेदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय ओळखपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने मिळाली. सध्या पोलिसांकडून या ओळखपत्रांची पडताळणी सुरु आहे. तसेच एजंट लोकांना आधार कार्ड बनवण्यासाठी कोण मदत करत आहे याचादेखील शोध साकीनाका पोलीस करत आहेत.

इतर बातम्या – 

फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे
मराठा आरक्षणावर तोडगा काढा, कोणतीही उणीव ठेवू नका; अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा

(one more Bangladeshi national arrested from Malegaon)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.