एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात दगड घातला, 4 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: Feb 24, 2020 | 7:18 AM

एका घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात (Beed youth attack in women) आला.

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात दगड घातला, 4 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Follow us on

बीड : एका घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात (Beed youth attack in women) आला. बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुनील जाधव असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून सुनीलची पीडित महिलेवर नजर होती. तो अनेकदा तिला त्रास द्यायचा. त्या महिलेसोबत छेडछाड करायचा. तिला त्रास असह्य झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली. मात्र पोलिसांनी समज देऊन आरोपी सोडले. इथंच आरोपीचं फावलं.

काल (22 फेब्रुवारी) त्याने “तू माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा मी तुला जगू देणार नाही?” अशी धमकी दिली. त्यानंतर क्षणार्धात त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती पीडित महिला गंभीर जखमी झाली.

सध्या तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. हिंगणघाटची घटना ताजी असताना बीडमध्ये जिवंत मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महिलेचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणाची मागणी पीडितेच्या कुटुंबांनी केली (Beed youth attack in women)  आहे.

तर दुसरीकडे ‘टीव्ही 9 मराठी’ने ही बातमी दाखवल्यानंतर बीडमधील पोलीस यंत्रणा कामाला लागली. फक्त चार तासांच्या आत या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. महिलेची हत्या करुन हा आरोपी लपून बसला होता. पोलिसांनी फोन लोकेशनवरून त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

काही दिवसांपूर्वी हिंगणघाट मधील प्रकार समोर आला असताना आता बीडमध्येही जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन बीडमधील महिला किती असुरक्षित आहेत. ते सांगण्याची गरज नाही. पोलीस अधीक्षकांनी एकीकडे महिला आणि मुलींसाठी सुरक्षाकवच नावाची योजना राबविली. दुसरीकडे मात्र भर दिवसा अशा भ्याड हल्ल्यामुळे पोलिसांच्या महिला सुरक्षा कवच योजनेचा धज्जा उडल्याचं दिसून आले. आता या आरोपीवर पोलीस काय कठोर कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार (Beed youth attack in women)  आहे.