सोनाक्षी सिन्हाची ही क्राइम सीरिज पाहून तुमचं डोकं चक्रावेल, या OTT वर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
आज आम्ही तुम्हाला अशा एका सीरिजबद्दल सांगणार आहोत, जिची कथा प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते. एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक.

ओटीटीवर क्राइम थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या वेब सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘दहाड’ ही एक लक्षवेधी सीरिज आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने या सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. महिलांच्या बेपत्ता होण्यामागील रहस्य, संशयास्पद व्यक्ती आणि गुन्ह्यांचा तपास अशा घटनांमुळे कथेत उत्सुकता कायम राहते.
काय आहे ‘दहाड’ची कथा?
या सीरिजची सुरुवात सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने होते. तपासादरम्यान अनेक महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस तपास सुरू होतो.
सोनाक्षी सिन्हा हिने अंजली भाटी या धाडसी पोलीस उपनिरीक्षकाची भूमिका साकारली आहे. तपासादरम्यान तिच्यासमोर अनेक गुंतागुंतीची आव्हाने उभी राहतात. आनंद स्वर्णकार नावाचा एक व्यक्ती वरकरणी शांत आणि सभ्य दिसत असला तरी त्याच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होते. या प्रकरणातील सत्य उलगडताना अनेक अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळतात.
जातीय भेदभावासारख्या गंभीर मुद्द्यांवर भाष्य
‘दहाड’ ही केवळ गुन्ह्यांचा तपास करणारी कथा नाही. या सीरिजमध्ये लहान शहरांमधील सामाजिक रूढी, जातीय भेदभाव, महिलांची असुरक्षितता आणि सामाजिक विषमता यांसारखे विषयही मांडले आहेत. त्यामुळे कथेला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक संदर्भही मिळतो.
या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हासोबत विजय वर्मा, गुलशन देवैया, सोहम शाह आणि जयती भाटिया यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सोनाक्षीच्या अभिनयाचेही प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झाले होते.
कुठे पाहता येईल ‘दहाड’?
जर तुम्हाला देखील ही सीरिज घर भसल्या बघायची असेल तरी ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहू शकता. पहिल्या सीजनमध्ये 8 भाग आहेत. या सीरिजला IMDb रेटिंग 7.6 देण्यात आली आहे.
दुसऱ्या सीझनबाबत अधिकृत घोषणा किंवा रिलीजच्या तारखेची खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याने त्याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित सांगता येत नाही. रहस्य, गुन्हेगारी तपास, अनपेक्षित वळणे आणि सामाजिक विषय यांचा संगम असलेली ‘दहाड’ ही क्राइम थ्रिलर सीरिज एकदा बघण्यास सुरुवात केली तर अनेकजण शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत.
