देश चालवण्यासाठी पाकिस्तानवर गाढव विकण्याची वेळ

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आहे. अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारला चक्क गाढवांची विक्री करावी लागत आहे. म्हणजे पाकिस्तान सरकार गाढवांच्या भरवश्यावर देश चालवत आहे. यासाठी पाकिस्तानात ‘गाढव विकास योजना’ राबवली जात आहे. पाकिस्तानमध्ये गाढवांची सेना पाकिस्तान ‘गाढव विकास योजने’अंतर्गत गाढवांची एक सेना तयार करत आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल एक अरब डॉलरची गुंतवणूक करण्यात […]

देश चालवण्यासाठी पाकिस्तानवर गाढव विकण्याची वेळ

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आहे. अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारला चक्क गाढवांची विक्री करावी लागत आहे. म्हणजे पाकिस्तान सरकार गाढवांच्या भरवश्यावर देश चालवत आहे. यासाठी पाकिस्तानात ‘गाढव विकास योजना’ राबवली जात आहे.

पाकिस्तानमध्ये गाढवांची सेना

पाकिस्तान ‘गाढव विकास योजने’अंतर्गत गाढवांची एक सेना तयार करत आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल एक अरब डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. गाढवांची विक्री करुन पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.  

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इम्रान खानचा मोठा निर्णय

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने एका मोठ्या अर्थतज्ञाला निवडले आहे. पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) कार्यरत असलेले डॉ. रजा बाकिर यांची पाकिस्तानी स्टेट बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. एसबीपी ही पाकिस्तानची केंद्रीय बँक आहे. सध्या पाकिस्तान आयएमएफसोबत अरबो डॉलरच्या मदत पॅकेजसाठी चर्चा करत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. इम्रान खान सरकारने एसबीपी आणि राष्ट्रीय महसूल मंडळाच्या प्रमुखांना त्यांच्या पदावरुन काढलं. काहीच दिवसांपूर्वी आयएमएफचं पथक मदत पॅकेजवर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादला आलं होतं. आयएमएफच्या कार्यक्रमात एसबीपी गव्हर्नर आणि एफबीआयचे संचालक यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सरकारने शनिवारी रात्री एक अधिसूचना जारी करत राष्ट्रपतींनी डॉ. रजा बाकिर यांना पद ग्रहण केल्यापासून तीन वर्षांसाठी एसबीपीचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केल्याचं जाहीर केलं. बाकिर यांनी हावर्ड आणि कॅलिफोर्नियाच्या विश्वविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. बाकिर हे 2000 मध्ये आयएमएफसोबत जोडले गेले. सध्या ते इजिप्तमध्ये आयएमएफचे वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI