माझा अभिमन्यू करण्याचा डाव, पण चक्रव्यूह कसं भेदायचं मला माहीत: पंकजा मुंडे

मला अभिमन्यू करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता. चक्रव्यूहात अडकवण्याचा त्यांचा डाव होता. पण हे चक्रव्यूह कसं भेदायचं मला माहीत आहे, असं सांगतानाच रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं.

माझा अभिमन्यू करण्याचा डाव, पण चक्रव्यूह कसं भेदायचं मला माहीत: पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 6:12 PM

बीड: पंकजा मुंडे संपल्या आता त्या काही परत राजकारणात उभ्या राहत नाहीत, असं काही लोकांना वाटत होतं. काही लोकांनी तर मला अभिमन्यू करून चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हे चक्रव्यूह कसं भेदायचं हे मला माहीत आहे, असा घणाघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. (pankaja munde on her political career)

भगवान गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी आक्रमक आणि तडाखेबंद भाषण केलं. मला अभिमन्यू करण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता. चक्रव्यूहात अडकवण्याचा त्यांचा डाव होता. पण हे चक्रव्यूह कसं भेदायचं मला माहीत आहे, असं सांगतानाच रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा, असं आवाहन पंकजा यांनी केलं.

माझ्याकडे आता कोणतंही पद नाही. आमदारकी नाही की साधी ग्रामपंचायतीची सदस्यही नाही. आता पंकजा मुंडेंचं राजकारण संपलं आहे. त्या पुन्हा येणार नाहीत, अशा वावड्या काही लोकांनी उठवल्या. पण लोकांची ही गर्दी पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

जोपर्यंत मी जीवंत आहे. तोपर्यंत भगवान गडावर येणार. मी आज आमदार नाही. ग्रामपंचायतीची सदस्यही नाही. पण तुम्ही खचून जाऊ नका. मी तुमच्या जीवावरच उभी आहे, असं सांगतानाच मी तुमच्यासोबत आहे. महाराष्ट्रभर फिरणार आहे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आणि पोटात भूक आहे, अशा शेवटच्या माणसासाठी मी झटणार आहे, अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

120 आमदार बनवायचे आहेत

सध्या रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे सजग राहा. आपली वज्रमुठ कायम ठेवा. आपली वज्रमुठ कायम असेल तर मोठमोठी सत्ताही हादरून जाते. आपल्याला धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही. आपल्याला राज्यात 120 आमदार बनवायचे आहेत, असं त्या म्हणाल्या.

शिवाजी पार्क भरवायचं आहे

आता मी राज्यात फिरणार आहे. गावोगावी जाऊन पाहणी करणार आहे. कोरोना असला तरी फिरणार आहे. रस्त्यावर कसं उतरायचं हे मला चांगलंच माहीत आहे. आता नुसतं भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईतलं शिवाजी पार्कही भरवायचं आहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे, अशी घोषणा त्यांनी करताच पंकजा मुंडे जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. (pankaja munde on her political career)

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

(pankaja munde on her political career)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.