AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत याच्या खोलीचा दरवाजा त्या दिवशी…, अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल मोठी माहिती समोर

Sushant Singh Rajput | सुशांत याच्या मृत्यूपूर्वी असं झालं तरी काय होतं? सुशांत सिंह राजपूत याच्या खोलीचा दरवाजा, घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरे, अभिनेत्याच्या घराच्या चाव्या... धक्कादायक माहिती समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या मृत्यूची चर्चा...

सुशांत सिंह राजपूत याच्या खोलीचा दरवाजा त्या दिवशी..., अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल मोठी माहिती समोर
| Updated on: May 03, 2024 | 8:12 AM
Share

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे येथील घरात स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी शोक व्यक्त केला. पण निधनाच्या इतक्या वर्षांनंतर देखील अभिनेत्याने टोकाचं पाऊल का उचलंल याबद्दल काही कळलेलं नाही. आता सुशांत याच्या निधनाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या खोलीचा दरवाजा, घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरे, अभिनेत्याच्या घराच्या चाव्या… इत्यादी गोष्टींबद्दल अभिनेत्याच्या बहिणीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत याच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

सुशांत याचे कुटुंबिय सतत अभिनेत्याच्या मृत्यूनंतर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुशांत याची बहीण श्वेता किर्ती सिंग हिने मोठा खुलासा केला आहे. श्वेता म्हणाल्या, ‘दिशा सानियाल हिच्या निधनानंतर सुशांत कायम अस्वस्थ राहात होता. ते लोकं मला देखील सोडणार नाहीत.. असं देखील तो मला सांगत होता.’

पुढे श्वेता म्हणाल्या, ‘त्या दिवशी सुशांत याच्या अपार्टमेंटचे कॅमेरे बंद होते. परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद होते. ते सीसीटीव्ही कॅमेरे का बंद होते?’ असे अनेक प्रश्न अभिनेत्याच्या बहिणीने उपस्थित केले आहेत. सुशांत त्याच्या खोलीचा दरवाजा कधीच बंद करत नव्हता. पण त्या दिवशी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता.

‘जेव्हा अपार्टमेंट सोडतो तेव्हा चाव्या परत करायच्या असतात. पण तेव्हा फक्त सुशांत याच्या खोलीची चावी गायब होती…’ असं देखील सुशांत याच्या बहिणीने वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, श्वेता कायम अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर सुशांत याने इतकं मोठं पाऊल का उचललं? यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून टीव्ही विश्वावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. सोशल मीडियावर देखील सुशांत कायम सक्रिय असायचा. आजही अभिनेत्याचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत सुशांत याच्या नावाची चर्चा रंगली. सुशांत याचं निधन झालं तेव्हा तो अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला डेट करत होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.