AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे कारण…

baramati lok sabha constituency: बारामती मतदार संघातील सर्व ३८ उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी तपासण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये सादर केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी २८ एप्रिलपर्यंत ३७ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च केले आहे.

बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस, काय आहे कारण...
Sunetra pawar and supriya suleImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 03, 2024 | 8:05 AM
Share

लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. या दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवणारा प्रकार घडला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगने नोटीस बजावली आहे. खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगितले आहे.

४८ तासांत खुलासा करावा

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात ९ लाख १० हजाराची तफावत आढळून आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांत खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे.

आक्षेप असल्यास दाद मागा

नोटीसवर आक्षेप असल्यास जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार उमेदवारांना आहे. बारामती मतदार संघातील सर्व ३८ उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील बुधवारी तपासण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये सादर केला आहे. या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळली. त्यामुळे ही नोटीस देण्यात आली.

सुप्रिया सुळे यांनी २८ एप्रिलपर्यंत ३७ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च केले आहे. या खर्चाची तुलना शॅडो रजिस्टरशी केल्यानंतर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळली. दोन्ही उमेदवारांना या नोटीसचे उत्तर ४८ तासांत द्यावे लागणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.