
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागतोय. काही वर्षांपासून महापालिकांची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. शेवटी पालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. परभणी महापालिकेवरही प्रशासकीय राज बघायला मिळाले. 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. परभणी महानगरपालिका हद्दीत एकूण 16 प्रभाग आहेत. त्यातील सदस्य संख्या 65 एवढी आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभाग संख्या 15 व पाच सदस्यीय प्रभाग संख्या 1 अशी आहे.
साल 2012 मध्ये परभणी महानगरपालिका अस्तित्वात आली, पहिल्याच महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता आणली आणि प्रताप देशमुख महापौर तर सज्जू लाला उपमहापौर झाले. 2017 निवडणुकीमध्ये काँग्रेस परभणी महापालिका सर्वात मोठा पक्ष होता, भाजपच्या समर्थनाने काँग्रेसने 2017 सत्ता आणली होती. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या पत्नी मीना वरपूडकर ह्या महापौर तर माजू लाला उपमहापाैर झाले.
परभणी महापालिका वॉर्ड क्रमांक 6 मध्ये पुरूष 8,675, महिला 8.880 अशी एकून 17,555 मतदार संख्या आहे. वांगी रोड, राहुल नगर, मिलिंद नगर, हमालवाडी, पार्वती नगर, दादाराव प्ल्रट, गाैतम नगर, ढोरवडा इथपर्यंत प्रभाग क्रमांक 6 येतो. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 8.013 पुरूष, 7,922 महिला, एकून 15,935 मतदारांची संख्या आहे. महादेव रोड नानलपेठ, विद्यानगर, बेलेश्वर नगर, रंगनाथ महाराज नगर, गणेश नगर, मोची कॉलनी, फिरोज टॉकीज, तेलंग गल्ली, लंगोट गल्ली, वकील कॉलोनी, मराठवाडा हायस्कूल, साकला प्लॉटपर्यंत प्रभाग येतो.
प्रभाग क्रमांक 8 मध्ये 9,492 पुरूष, 9.260 महिला एकून 18,752 मतदारांची संख्या आहे. लोहार गल्ली, कुंभार गल्ली, जुनी मंडी, शिवाजी नगर, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, ठोबराबेस भोई गल्ली, जिजामाता रोड मढी शाळा, वकील कॉलनी, शाही मज्जीद, आजाद कॉर्नर, गोरक्षण रोड जवळ कालाबाबर गवळी गल्ली मोमीन पुरा, मोढा रोड, बागवान गल्ली, गव्हाणे रोड महाराणी लक्ष्मीबाई बी रघुनाथ हॉल, वसमत रोड, रेणुका नगर मासुम कॉलनी परभणी शहर.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE