हैद्राबादमध्ये डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर घेण्यास नकार

| Updated on: Oct 26, 2019 | 8:38 AM

मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून जेवणाची ऑर्डर घेण्यास एका व्यक्तीने नकार (Swiggy muslim delivery boy) दिला आहे. ही घटना हैद्राबाद येथे घडली.

हैद्राबादमध्ये डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर घेण्यास नकार
Follow us on

हैद्राबाद : मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून जेवणाची ऑर्डर घेण्यास एका व्यक्तीने नकार (Swiggy muslim delivery boy) दिला आहे. ही घटना हैद्राबाद येथे घडली. त्यामुळे या व्यक्तीच्याविरोधात डिलिव्हरी बॉयने पोलिसांत तक्रार दाखल केली. धर्म विचारुन जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार (Swiggy muslim delivery boy) दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली आहे. मुदस्सिर सुलेमान असं तक्रार करणाऱ्या मुलाचं नाव आहे.

हा डिलिव्हरी बॉय स्विगी कंपनीत कामाला आहे. त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, आलियाबाद उत्तर विभागात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्विगीवर फलकनुमा स्थित ग्रँड बावर्ची रेस्टोरेंटवर चिकन 65 ऑर्डर केले होते. ऑर्डर करताना त्यांनी म्हटलं की, डिलिव्हरी बॉय हिंदू धर्माचा असावा.

स्विगीच्या अॅपमधून डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची निवड ऑटोमॅटिक होते. त्यामुळे ग्राहकाची ही विनंती मानली गेली नाही. जेव्हा डिलिव्हरी बॉय मुदस्सिर सुलेमानने ग्राहकाला फोन केला तर त्यांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिला.

मुदस्सिरने ही घटना मुस्लिम संघटना मुस्लिम बचाओ तरहीकचे अध्यक्ष अमजद उल्लाह खान यांच्यापर्यंत पोहचवला. अमजद यांनी ग्राहकाची विनंती स्क्रीनशॉटसह संपूर्ण बोलणं ट्वीट केले आणि पोलिसांकडे तक्रार केली.

धर्मभेद करणाऱ्या या व्यक्तीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉयलाही मुस्लिम असल्याने त्याच्याकडून जेवण घेण्यास नकार दिला होता.