कोरोनामुळे नोकरी गेली, 4-6 लाख कमावणाऱ्या पायलटवर डिलिव्हरी बॉय होण्याची नामुष्की

| Updated on: Jun 22, 2020 | 2:29 PM

कोरोना विषाणूच्या संकाटामुळे थायलंडमधील एका कमर्शिअल पायलटची नोकरी गेली (Pilot lost job due to Corona) आहे.

कोरोनामुळे नोकरी गेली, 4-6 लाख कमावणाऱ्या पायलटवर डिलिव्हरी बॉय होण्याची नामुष्की
Follow us on

बँकॉक (थायलंड) : कोरोना विषाणूच्या संकाटामुळे थायलंडमधील एका कमर्शिअल पायलटची नोकरी गेली (Pilot lost job due to Corona) आहे. नोकरी गेल्याने पायलट आता डिलिव्हरी बॉयचे काम करत आहे. हा पायलट महिन्याला 4 ते 6 लाख रुपये कमवत होता. नकारिन इंटा (42) असं या पायलटचे नाव आहे. घरो-घरी तो सामान पोहचवण्याचे काम सध्या करत आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काही उद्योगधंद्यांचेही नुकसान झाल्याने बंद पडले (Pilot lost job due to Corona) आहेत.

“मला अजूनही आकाशात विमान उडवण्याची ईच्छा आहे. लहानपणापासून माझे आकाशात विमान उडवण्याचे स्वप्न होते”, असं इंटाने सांगितले.

इंटा गेल्या चार वर्षांपासून कमर्शिअल विमान उडवत आहे. पण कोरोनामुळे त्याची नोकरी गेली आहे. पण त्याने हिम्मत न हारता एक डिलिव्हरी बॉयची नोकरी सुरु केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना पगाराविना सुट्टीवर पाठवले आहे. तर काहींना कामावरुन कामावरुन कमी केले. त्यामुळे इंटाने डिलिव्हरी बॉयचे काम सुरु केले. इंटाचे इतर सहकारीही दुसरे काम करत आहेत.

इंटा विमान उडवत होता तेव्हा 4 ते 6 लाख रुपये कमवत होता. पण कोरोनाच्या संकटामुळे त्याला दोन हजार रुपये कमवणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थित सध्या इंटा त्याच्या इतर सहकाऱ्यांची खूप आठवण काढत आहे.

“पहिल्या दिवशी काम करताना मला खूप भीती वाटली होती. कारण मी असं काम यापूर्वी कधी केले नव्हते. जेव्हा मला पहिल्यांदा ऑर्डर मिळाली आणि मी यशस्वीपणे पार्सल ग्राहकापर्यंत पोहोचवले. तेव्हा मला समजले की मी हे काम करु शकतो. मी आकाशाकडे पाहून विचार करतो मला पुन्हा एकदा विमान उडवण्याची संधी मिळूदे”, असं इंटा म्हणाला.

संबंधित बातम्या : 

नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा, मनसेचं तरुणांना आवाहन

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेत स्थलांतरबंदी, नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी डोनाल्ड यांचे ‘ट्रम्प’ कार्ड