पिंपरीत तरुणी वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर, पोलिसांशी हुज्जत, खाक्या दाखवताच माफी

पिंपरी चिंचवडमध्ये दोन तरुणी चक्क वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडल्या. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी आपल्या घराचा रस्ता (Pimpri 2 women celebrating birthday) पकडला.

पिंपरीत तरुणी वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर, पोलिसांशी हुज्जत, खाक्या दाखवताच माफी
| Updated on: Apr 02, 2020 | 12:15 AM

पिंपरी-चिंचवड : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Pimpri 2 women celebrating birthday) आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरण्यास सर्वांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही हजारो तरुण रस्त्यावर फिरत असतात. नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये दोन तरुणी चक्क वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडल्या. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी आपल्या घराचा रस्ता पकडला.

पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनची परिस्थिती (Pimpri 2 women celebrating birthday) आहे. त्यात या दोन तरुणी बर्थडे साजरा करण्यासाठी घराबाहेर पडल्या. शहरात लॉक डाऊन असल्याने वाकड पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणींना जाब विचारला. मात्र त्यावेळी तरुणींनी उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

या दोन तरुणींची पोलिसांसोबतची भाषा ऐकून सर्वांना धक्का बसला. यानंतर काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघींवर गुन्हा दाखल करा असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर या दोन्ही तरुणींची पोलिसांची माफी भूमिका घेतली.

इतकंच नव्हे तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना आळा बसावा म्हणून वाकड पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 54 दुचाकी ताब्यात घेतल्या आहे. या तरुणांना पोलीस स्टेशनमध्ये सोशल डिस्टन्समध्ये बसून ठेवण्यात (Pimpri 2 women celebrating birthday) आले.