नवी दिल्ली: बिहारच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी, लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज (8 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर देशभरातून त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोकाकूल होत आदरांजली वाहिली आहे (PM Narendra Modi and other reaction on demise of Ram Vilas Paswan). रामविलास पासवान यांचं निधन माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र आणि मूल्याधिष्टित सहकारी गमावला आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी रामविलास पासवान यांच्या जाण्याने खूप दुःखी आहे. देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. रामविलास पासवान यांचं निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र, मूल्याधिष्टित सहकारी आणि गरीबांना सन्मानाचं जगणं देण्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला गमावलं आहे. रामविलास पासवान हे राजकारणात खूप कष्टाने पुढे आले. एक युवा नेते म्हणून त्यांनी आणीबाणी काळात होणारे अन्याय आणि अत्याचार यांना प्रखर विरोध केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते. त्यांनी अनेक धोरणं तयार करताना महत्त्वाचं योगदान दिलं.”
Shri Ram Vilas Paswan Ji rose in politics through hardwork and determination. As a young leader, he resisted tyranny and the assault on our democracy during the Emergency. He was an outstanding Parliamentarian and Minister, making lasting contributions in several policy areas. pic.twitter.com/naqx27xBoj
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020
शरद पवार म्हणाले, “रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. ते एक ज्येष्ठ नेते आणि लोकशक्ती पक्षाचे संस्थापक होते. एक संसदपटू म्हणून माझा त्यांच्यासोबत जवळून संबंध आला. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी सहवेदना.”
Saddened to hear about the demise of Shri Ramvilas Paswan.
He was a veteren leader and founder of Lok Janshakti Party. I had a long association with him as a Parliamentarian.
My sincere condolences to his family. RIP— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2020
राहुल गांधी म्हणाले, “रामविलास पासवान यांच्या अवेळी जाण्याच्या बातमीने खूप दुःख झाले. गरीब-दलित वर्गाने आज आपला एक बुलंद राजकीय आवाज गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.”
रामविलास पासवान जी के असमय निधन का समाचार दुखद है। ग़रीब-दलित वर्ग ने आज अपनी एक बुलंद राजनैतिक आवाज़ खो दी।
उनके परिवारजनों को मेरी संवेदनाएँ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 8, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान जी यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान जी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे??
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 8, 2020
रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
आपातकाल विरोधी आंदोलन के दौरान जयप्रकाश नारायण जैसे दिग्गजों से लोकसेवा की सीख लेनेवाले पासवान जी फायरब्रांड समाजवादी के रूप मे उभरे। उनका जनता के साथ गहरा जुड़ाव था और वे जनहित के लिए सदा तत्पर रहे। उनके परिवार और समर्थकों के प्रति मेरी गहन शोक-संवेदना।
— President of India (@rashtrapatibhvn) October 8, 2020
नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी के निधन की खबर से मैं स्तब्ध हूं। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। गरीब, वंचित तथा शोषितों के उत्थान में पासवान जी का महत्वपूर्ण योगदान रहा है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें और परिजनों को संबल दे। ॐ शांति।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 8, 2020
रामविलास पासवानजी यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता गमावला : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. गरिब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. रामविलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. अनेक दशके त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले. बिहारच्या विकासाला आणि राजकारणाला एक नवीन उंची त्यांनी प्रदान केली. सुमारे 9 वेळा त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्त्व केले.”
केन्द्रीय मंत्री माननीय राम विलास पासवान जी के आकस्मिक निधन के बारे में जानकर अत्यंत दुख हुआ।
कई दशकों तक उन्होंने जनता के दिल पर राज किया।
बिहार की राजनीति और विकास में उनकी प्रमुख भूमिका रही।
क़रीब ९ बार उन्होंने संसद में प्रतिनिधित्व किया।@iChiragPaswan pic.twitter.com/WQDH4seBJF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2020
“अतिशय विनम्र आणि लोकांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न घेऊन त्यांच्याशी सातत्याने संवाद होत असे आणि प्रत्येकवेळी त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असायचा. गरिब आणि वंचितांसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. या महान नेत्याला माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल दुःख : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली.”
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री राम विलास पासवान, यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली.
— Governor of Maharashtra (@maha_governor) October 8, 2020
“पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या शोक संवेदना कळवतो,” असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे. भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे. दिवंगत रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) October 8, 2020
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, “केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे . त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान झाले आहे. भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे.”
संबंधित बातम्या :
Ram Vilas Paswan | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
PHOTO | रामविलास पासवान: भारतीय राजकारणातील संघर्ष नायक!
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक पत्र
PM Narendra Modi and other reaction on demise of Ram Vilas Paswan