पुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार?

| Updated on: Oct 20, 2020 | 2:17 PM

नरेंद्र मोदी पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परंतु यामध्ये तथ्य नसून देशात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार नाही.

पुन्हा लॉकडाऊन लावण्याची अफवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं कोणत्या विषयावर बोलणार?
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार 20 ऑक्टोबर) 6 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. कोरोना, अनलॉक, भारतीय अर्थव्यवस्था, भारत-चीन संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना नरेंद्र मोदी पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. परंतु यामध्ये तथ्य नसून देशात पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार नाही. (PM Narendra Modi to address Nation amid rumors of announcing Lockdown again)

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या आराखड्याबाबत पंतप्रधान संदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनावर अंकुश मिळवण्यात भारताला आतापर्यंत आलेल्या यशाबद्दल मोदी भाषणात बोलू शकतात. कोरोनावर लस मिळेपर्यंत ढिलाई करता येणार नाही, हा मुद्दा नरेंद्र मोदी अधोरेखित करण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या काळात अधिक खबरदारी

केरळमध्ये ओणम, तर महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नवरात्री सुरु झाल्या असून दसरा-दिवाळीसारखे मोठे सण काही दिवसांवर आले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मोदी भाषणात करण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मोदी त्यावर भाष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात आहेत. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रुपरेखा तयार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले होते. याविषयीही मोदी माहिती देण्याची शक्यता आहे.

कोव्हिडविषयी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. कोरोना लशीच्या वितरणाबाबत तयारी करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, त्यामुळे लसीबाबत गुड न्यूज मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (PM Narendra Modi to address Nation amid rumors of announcing Lockdown again)

कोरोना काळातील सातवे संबोधन

कोरोनाच्या काळात सातव्यांदा पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. याआधी जनता कर्फ्यू, लॉकडाऊनची घोषणा, लॉकडाऊनमधील वाढ अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

आठचा मुहूर्त चुकवला

नोटाबंदीच्या विषयापासून जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा अनेक महत्त्वाच्या घोषणांसाठी पंतप्रधानांनी रात्री आठ वाजताचा मुहूर्त निवडला होता. यावेळी मात्र त्यांनी संध्याकाळी सहा वाजताची वेळ निश्चित केली आहे.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या विषयावर संबोधित करणार, आठ वाजताची वेळ बदलली!

(PM Narendra Modi to address Nation amid rumors of announcing Lockdown again)