VIDEO | जेव्हा पंतप्रधान व्यासपीठावरच महिलेच्या पाया पडण्यासाठी झुकतात…

| Updated on: Jan 03, 2020 | 1:38 PM

तुमकुरमध्ये कृषी कर्मण आणि किसान क्रेडिट कार्ड वितरण समारंभावेळी नरेंद्र मोदींनी महिलेचे चरण स्पर्श केले

VIDEO | जेव्हा पंतप्रधान व्यासपीठावरच महिलेच्या पाया पडण्यासाठी झुकतात...
Follow us on

बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील भरसभेत व्यासपीठावरच एका महिलेचे चरणस्पर्श करण्यासाठी झुकल्याचं पाहायला मिळालं. तुमकूरमध्ये सभेला संबोधित केल्यानंतर कृषी कर्मण पुरस्कारांचं वितरण करताना हा प्रकार घडला. झुकून नमस्कार करणाऱ्या महिलेला अडवत मोदींनी तिचेच चरणस्पर्श (Modi Touches Feet of Lady) केले.

नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तुमकुरमध्ये कृषी कर्मण आणि किसान क्रेडिट कार्ड वितरण समारंभ काल (गुरुवारी) झाला. कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

पुरस्कारासाठी नाव पुकारताच संबंधित महिला स्टेजवर आली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी तिला हात जोडून नमस्कार केला. प्रशस्तिपत्रक देत मोदींच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वसामान्यपणे जे होतं, तेच घडलं. सन्मानार्थी महिला मोदींच्या पाया पडायला गेली. तेव्हा नरेंद्र मोदींनी तिला अडवलं. इतक्यावर न थांबता, ते स्वत: तिच्या पाया पडण्यासाठी झुकले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेसह स्टेजवरील मान्यवर आणि सभेला उपस्थित नागरिकही आश्चर्यचकित झाले. या घटनेचा व्हिडीओ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

‘प्रत्येक आई-मुलीचा सन्मान. बंगळुरुत जेव्हा एक महिला मोदीजींचे चरण स्पर्श करणार होती, तेव्हा त्यांनी तिला फक्त सन्मानपूर्वक थांबवलंच नाही, तर ते स्वतःच तिच्या पाया पडण्यासाठी झुकले. हा व्हिडीओ हे सांगण्यासाठी आहे, की मोदीजी जे सांगतात, ते आचरणातही आणतात’ असं हर्ष वर्धन यांनी लिहिलं आहे.

Modi Touches Feet of Lady