पीएमपीएलच्या उत्पन्नात वाढ, तिजोरीत तब्बल 50 लाख जमा

| Updated on: Nov 20, 2020 | 8:20 AM

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरु झाल्यानंतर पीएमपीएल महामंडळाने सर्वाधिक उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. (PMPML Bus get 50 Lakh Income)

पीएमपीएलच्या उत्पन्नात वाढ, तिजोरीत तब्बल 50 लाख जमा
Follow us on

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरु झाल्यानंतर पीएमपीएल महामंडळाने सर्वाधिक उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. पीएमपीएलच्या तिजोरीत तब्बल 50 लाख रुपये उत्पन्न जमा झाले आहेत. या काळात जवळपास 3 लाख 15 हजार प्रवाशांनी पीएमपीएलच्या बसमध्ये प्रवास केला आहे. (PMPML Bus get 50 Lakh Income)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आले होते. या अनलॉक प्रक्रियेतंर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएल बसची वाहतूक 3 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली होती. यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात 25 टक्के बस रस्त्यावर धावत होत्या.

मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता पीएमपीएल बस प्रशासनाने बससंख्या वाढवली होती. यामुळे दिवाळीपूर्वी पीएमपीएल प्रशासनाला दररोज 40 ते 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण दिवाळीच्या चार दिवसात पीएमपीएलचे उत्पन्न 35 लाखांपर्यंत घटले होते.

मात्र दिवाळी संपल्यानंतर पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्येत वाढ झाली आहे. त्यातून 50 लाखांच्या उत्पन्नाचा टप्पा ‘पीएमपी’ने गाठला आहे. ‘पीएमपी’च्या बसगाड्यांनी मंगळवारी सुमारे दोन किलोमीटरच्या प्रवाशांसाठी धाव घेतली. तर 13 हजार 210 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे पीएमपीएल महामंडळाला दिलासा मिळाला आहे. (PMPML Bus get 50 Lakh Income)

संबंधित बातम्या : 

दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी 14 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

Tanay Manjrekar | पुण्याचा तनय मांजरेकर ‘हायपरलूप’मध्ये बसणारा पहिला भारतीय