टोकदार काट्यावर पाठ टेकवली, झोळी भरुन दक्षिणा घेतली, पुण्यात कथित बाबासह 40 जणांवर गुन्हे दाखल

| Updated on: Jul 06, 2020 | 8:06 AM

शिरुरमधील चिंचणी गावात एका तथाकथित बाबाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठा धार्मिक कार्यक्रम घेतल्याचं समोर आलं आहे (Police Action against religious baba).

टोकदार काट्यावर पाठ टेकवली, झोळी भरुन दक्षिणा घेतली, पुण्यात कथित बाबासह 40 जणांवर गुन्हे दाखल
Follow us on

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यात सर्वच ठिकाणी धार्मिकांना कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. असं असतानाही शिरुरमधील चिंचणी गावात एका तथाकथित बाबाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठा धार्मिक कार्यक्रम घेतल्याचं समोर आलं आहे (Police Action against religious baba). विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक सर्व नियमांची पायमल्ली झालेली पाहायला मिळाली. आधीच कोरोनाची वाढती संख्या आणि त्यात हे कार्यक्रम याने कोरोनाचा धोका आणखी वाढत आहे.

शिरुरमधील या कथित बाबाने वाद्याचा गजर करत गावामधून मिरवणूकही काढली. यावेळी सर्वांसमोर हा तथाकथित बाबा टोकदार काट्यावर पाठ टेकवून झोपला. त्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून झोळी भरुन पैसेही स्वीकारले. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण जमाव जमवणे आदी नियमांचा भंग झाल्याचं समोर आल्याने शिरूर पोलीस ठाण्यात 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं (Ajit Pawar on increasing corona patient in Pune). पुणे आणि पुणे जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतील अशा थेट शब्दात अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. पुण्यात नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत असतानाही कारवाई होत नसल्याने अजित पवारांनी हा इशारा दिला होता.

यानंतर प्रशासनाने जोरदार कामाला सुरुवात केली. पुण्यातील लोणी काळभोर येथे ग्रामपंचायतच्या माजी सदस्याने कोरोनामुक्तीचा जल्लोष करत थेट डीजे लावून डान्स केला (FIR for Celebrating cure from Corona infection in Pune). यानंतर प्रशासनाने या प्रकरणी 16 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी शुक्रवारी (4 जुलै) ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या तब्बल 1 हजार 16 कारवाया केल्या. तसेच, विना मास्क फिरणाऱ्या 102 जणांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाचा संसर्ग

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

Police Action against religious baba