पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला (Pune Mayor Murlidhar Mohol Family Corona Positive) आहे.

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला (Pune Mayor Murlidhar Mohol Family 8 People Corona Positive) आहे. या आठ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल शनिवारी (4 जुलै) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.

मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात आज त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोना झाला आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोनाबाधित

मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली. चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले (Pune Mayor Murlidhar Mohol Family 8 People Corona Positive) आहेत.

“थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील”, असं ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मात्र, शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली. शुक्रवारी (3 जुलै) पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत ते हजर होते. या बैठकीत वेगवेगळ्या मागण्याही मांडल्या. त्याचबरोबर पालिका प्रशासन, नगरसेवक कार्यकर्ते ही त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यामुळे महापौरांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची पाचावर धारण बसली आहे. लॉकडाउनच्या काळात सातत्याने ते नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर (Pune Mayor Murlidhar Mohol Family 8 People Corona Positive) होते.

संबंधित बातम्या : 

Murlidhar Mohol Corona | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *