AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

'जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस', अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती. | Rupali Patil

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
| Updated on: Nov 25, 2020 | 11:35 PM
Share

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार रुपाली पाटील (Rupali Patil) यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी साताऱ्यातून या व्यक्तीला ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एक जोगता असून भिक्षा मागून आपली गुजराण करतो. (police arrested person who threatened MNS leader Rupali Patil)

काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांना हा धमकीचा फोन आला होता. ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करु नकोस’, अशा भाषेत पाटील यांना धमकी देण्यात आली होती. यानंतर रुपाली पाटील यांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या घटनेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली होती. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असे राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितले होते.

तेव्हापासून खडक पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी रुपाली पाटील यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशील जमवण्यास सुरुवात केली. हा तपशील आल्यानंतर पोलिसांना शितोळे याच्या पहिल्या पत्नीचा शोध लागला. तिच्याकडून पोलिसांना मोहन शितोळेचे आणखी पाच-सहा मोबाईल क्रमांक मिळाले. यापैकी एका मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरुन पोलिसांनी मोहन शितोळे याला कराडच्या ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

पुणे शहरातील मनसेचा आक्रमक आवाज म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची बाजू घेऊन त्या सातत्याने भांडत असतात. कोव्हिड काळात देखील अनेक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील गैरप्रकार त्यांनी उघडे पाडले होते. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्या सासत्याने भूमिका घेत असतात.

राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या:

Photo | ‘आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस’, रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना मेसेज

महाविकासआघाडीने पुण्यात आजोबांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलीय; मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंची टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.