AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो तुमचं काळीज कोण काळं करतंय? माझगाव, कुलाब्यात घातक कणाचं प्रमाण वाढलं, मुंबईचा श्वास मोकळा कसा होणार?

अवकाळी पावसामुळे राज्यभरातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. विशेषतः मुंबईत हवेची गुणवत्ता जास्त खालावत चालल्याचे निदर्शनास येत आहे. माझगाव आणि कुलाब्यात सर्वाधिक प्रदुषित हवा नोंदली गेली.

मुंबईकरांनो तुमचं काळीज कोण काळं करतंय? माझगाव, कुलाब्यात घातक कणाचं प्रमाण वाढलं, मुंबईचा श्वास मोकळा कसा होणार?
मुंबई राज्यात सर्वाधिक प्रदुषित शहर असल्याची नोंद
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 14, 2021 | 11:07 AM
Share

मुंबईः अवकाळी पावसामुळे राज्यभरातील हवामानात बदल दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी दाट धुकं दिसतंय. तर कुठे प्रदुषित हवेचे अच्छादन दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक प्रदूषण (Pollution) मुंबईत असल्याचं निदर्शनास आलं आहे.  मुंबईतील माझगाव (Mazgaon) आणि कुलाब्यात (Colaba) हवेचा गुणवत्ता स्तर अतिशय वाईट असल्याचे नोंदवण्यात आले. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. माझगावमध्ये 317 तर कुलाब्यात 313 एक्यूआयपर्यंत हा दर घसरला आहे. त्यामुळे दिवसभर मुंबईतील अनेक भागात प्रदुषित धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. हवेची अशी स्थिती राहिल्यास श्वसनाचे आजार असलेल्यांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मुंबईतील प्रदुषित हवेची कारणं काय?

यंदा हिवाळा सुरु झाल्यानंतर राज्यभरात अवकाळी पावसानं काही काळ मुक्काम केला होता. हा पाऊस आता कमी झाला असला तरीही मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वातावरणात गारवा जाणवत आहे. अशा काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. परिणामी प्रदूषणाची पातळी वाढू लागते तर हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते. त्यात दिवाळीतील फटाक्यांची भर पडली. त्यामुळे हा स्तर आणखीच घसरला असल्याचे सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणाली अहवालातून समोर आले आहे.

कुठे किती खालावला स्तर?

मुंबईतील कुलाबा आणि माझगाव परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट असल्याची नोंद करण्यात आली. माझगावमध्ये 317 तर कुलाब्यात 313 (AQI) एवढी नोंद झाली. संपूर्ण दिल्ली शहरातील हवेचा AQI 328 एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई 186, बीकेसी 215, मालाड 201, अंधेरी 142, चेंबूर 159, बोरिवली 116 एक्यूआय असा हवेचा दर्जा नोंदवण्यात आला. त्यापैकी कुलाबा, माझगाव, बीकेसी आणि मालाड येथील हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात आली.

कुणी खबरदारी घेणे आवश्यक?

एवढ्या प्रदुषित हवेमुळे श्वसनाचे आजार असलेल्या लहान मुले व वृद्धांनी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा हवेमुळे श्वसनविकारांचा आलेख वाढू शकतो. पोस्ट कोव्हिड रुग्ण, फायब्रोसिस अस्थमा असलेल्यांच्या औषधोपचारात यामुळे वाढ करावी लागू शकते. अशा लोकांनी विनामास्क फिरणे टाळावे, असा सल्ला जेजे रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. प्रीती मेश्राम यांनी दिला.

इतर बातम्या-

हॉर्न वाजवलात, गाडी चालवताना मोबाईलवर बोललात, हेल्मेट नाही घातलात तर सावधान, आजपासून खिसा रिकामा होणार, नियम लागू

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारनं परवानगी नाकारली! काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?