Poonam Pandey | गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण, अटकेनंतर पूनम पांडेला जामीन!

| Updated on: Nov 06, 2020 | 10:47 AM

चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत करण्याच्या आरोपावरून कॅनकोना येथून त्यांना अटक करण्यात आली होती.

Poonam Pandey | गोव्याच्या किनारी आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण, अटकेनंतर पूनम पांडेला जामीन!
Poonam Pandey
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे (Sam Bomabay) यांना गुरुवारी गोवा पोलिसांनी अटक केली होती. चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत करण्याच्या आरोपावरून कॅनकोना येथून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना कॅनकोना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने गुरुवारी रात्री नऊ वाजता जामीन मंजूर केला (Poonam Pandey and sam Bombay gets bail from goa court).

कॅनकोना पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कुनोलिम पीआय थेरॉन डी कोस्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जामीन मिळाला असला तरी, पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे पोलिसांच्या परवानगीशिवाय गोवा सोडू शकत नाहीत. दोघांनाही पुढचे सहा दिवस पोलीस ठाण्यात येऊन दररोज हजेरी लावावी लागणार आहे.

पूनम पांडे तुरूंगातच

सध्या पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे पोलिस ठाण्यात आहेत. त्यांनी अद्याप जामीन रक्कम जमा केलेली नाही. पूनम पांडे आणि तिचा नवरा जोपर्यंत 20,000 रुपये इतकी जामीन रक्कम देत नाहीत, तोपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार आहे.

पूनम आणि सॅमसह, एक कॉन्स्टेबल आणि कॅनकोना पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी चापोली धरणावर व्हिडीओ चित्रीकरणादरम्यान उपस्थित होते. याशिवाय जलसंपदा विभागाने चापोली धरणावर तैनात असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना देखील निलंबित केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Poonam Pandey and sam Bombay gets bail from goa court)

सरकारी मालमत्तेत आक्षेपार्ह चित्रीकरण

गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने पूनम पांडे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या एफआयआरमुळे पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

लग्नानंतर गोव्यावरून परतलेली पूनम नुकतीच पुन्हा गोव्यात परतली होती. पूनम पांडेचा सदर व्हिडीओ चित्रित करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या कलम 294 अन्वये पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली होती. त्यानंतर तिला स्थानिक कोर्टात हजार करण्यात आले होते.

(Poonam Pandey and sam Bombay gets bail from goa court)