नागपूरच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, कारागृहातही कोरोनाचा कहर, एका दिवसात 42 कैदी पॉझिटिव्ह

नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले (Possibility relockdown in some areas Nagpur) आहे.

नागपूरच्या काही भागात  पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, कारागृहातही कोरोनाचा कहर, एका दिवसात 42 कैदी पॉझिटिव्ह
सचिन पाटील

| Edited By:

Jul 04, 2020 | 12:15 PM

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले (Possibility relockdown in some areas Nagpur) आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागपूरच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे, असं मत नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्ह्यातील कारागृहातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जेलमध्ये काल (3 जुलै) 42 रुग्णांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जेलमध्ये आतापर्यंत एकूण 96 कोरोना रुग्ण आढळले (Possibility relockdown in some areas Nagpur) आहेत.

“नागपूरच्या दाटीवाटीच्यापरीसरात लॉकडाऊनची गरज आहे. गेल्या तीन दिवसात नागपूर जिल्ह्यात तब्बल 176 कोरोना रुग्ण वाढले आहेत. रोज नवनव्या परिसरात कोरोनाचा शिरकाव होत आहे. मोमीनपुरा, नाईक-तलाव बांग्लादेश, टिमकी यासारख्या परिसरासह आता झिंगाबाई टाकळी, अजनी या भागातही अनेक वस्त्यांमध्ये कोरोनानं शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांची काळजी असल्याने, कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये पुन्हा कडकडीत निर्बंधाची गरज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.”

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा कहर

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कारागृहात काल 42 कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कारागृहातील कोरोना रुग्णसंख्या 96 वर पोहोचली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे. कारागृहातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी, जेल प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात काल दिवसभरात 58 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. झिंगाबाई टाकळी परिसरात आणखी 12 नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1681 कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांत सर्वाधीक म्हणजे 176 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपुरात आतापर्यंत 1311 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

नागपूरसाठी दिलासादायक बातमी, मेयो-मेडिकलमध्ये 339 पैकी 309 कोरोना रुग्णांना एकही लक्षण नाही

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन

पुण्यात कोरोनामुक्तीचा जल्लोष अंगलट, डीजे लावून नाचणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें