AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध शिरोमणी अकाली दल आक्रमक, प्रकाश सिंह बादल यांच्याकडून ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत!

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलानं NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी 'पद्म विभूषण' पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध शिरोमणी अकाली दल आक्रमक, प्रकाश सिंह बादल यांच्याकडून 'पद्म विभूषण' पुरस्कार परत!
| Updated on: Dec 03, 2020 | 2:50 PM
Share

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल चांगलेच आक्रमक झाले आहेत. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं बादल यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. त्यात कृषी कायदा रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केलीय.(Prakash Singh Badal to return Padma Bhushan award against agriculture law)

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलानं NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी ‘पद्म विभूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे. तसं पत्रच बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलं आहे. यापूर्वी कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपचा NDAतील सर्वात जुना मित्र असलेला शिरोमणी अकाली दल युतीतून बाहेर पडला आहे.

The President, Shri Pranab Mukherjee presenting the Padma Vibhushan Award to the Chief Minister of Punjab, Shri Parkash Singh Badal, at a Civil Investiture Ceremony, at Rashtrapati Bhavan, in New Delhi on March 30, 2015.

विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी

दुसरीकडे काँग्रेसनंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. ससंदेचं विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची महत्वाची बैठक

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र विधानभवनात काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री आणि शेतकरी संघटनांची बैठक सुरु

तिकडे दिल्लीमध्ये 40 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यात बैठक सुरु आहे. यामध्ये शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी 5 कायदे परत घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यात कृषी कायद्यांसह वायू प्रदूषणाबाबतच्या कायद्याचाही समावेश आहे.

तर दिल्लीतच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातही बैठक पार पडली. ‘शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. यावर शेतकऱ्यांचं समाधान मी करु शकत नाही. पण अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कृषी कायद्याला आपला विरोध स्पष्ट केला आहे. तसंच हा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढा’, अशी मागणी केल्याचं अमरिंदरसिंह यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, राज्यात शेतकरी संघटनांचं उग्र आंदोलन, तर प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा एल्गार

Prakash Singh Badal to return Padma Bhushan award against agriculture law

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.