Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

| Updated on: Aug 10, 2020 | 4:38 PM

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Pranab Mukherjee tested corona Positive).

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
Follow us on

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे (Pranab Mukherjee tested corona Positive). त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.

“रुग्णालयात उपचारादरम्यान माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठवड्याभरात जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी सर्वांनी चाचणी करुन काही दिवसांसाठी स्वत:ला आयसोलेट करुन घ्यावं, अशी मी विनंती करतो”, असं प्रणव मुखर्जी ट्विटरवर म्हणाले (Pranab Mukherjee tested corona Positive).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

देशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण

प्रणव मुखर्जी यांच्याआधी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.